‘विठ्ठला, कोरोनाची तिसरी लाट येऊ देवू नको, कोरोनाला हरविण्यासाठी बळ दे ! भरपूर पाऊस पडू दे; पण शेतीचे नुकसान होऊ देवू नको !’ असे साकडे आमदार डाॅ. लहामटे यांनी पांडुरंगास घातले. यावेळी विठ्ठल देवस्थानचे विश्वस्त सचिव हेमंत आवारी, उपसरपंच वैभव नवले, अशोक नवले, सोमनाथ थोरात, डाॅ. सतीश चासकर, भाऊसाहेब नवले, मंगेश नवले, सुभाष नवले, चंद्रभान नवले, निखिल नवले, अशोक कडलग, सचिन जोशी, पांडुरंग नवले, महेश येवले, सुहास नवले, विकास देशमुख, विजय चौधरी, राजेंद्र ठोंबाडे, रेखा आवारी, सुलोचना नवले, माया नवले आदी उपस्थित होते.
यावेळी विठ्ठल देवस्थान, साई परिवार, तरुण मंडळ, गावकरी व आधार ब्लड बँकेच्या वतीने रक्तदान शिबिर घेण्यात आले. यात ५१ दात्यांनी रक्तदान केले.