युवक काँग्रेसच्या जिल्हा सरचिटणीसपदी विष्णू गुळवे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 22, 2021 04:23 IST2021-09-22T04:23:56+5:302021-09-22T04:23:56+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क अहमदनगर: जिल्हा युवक काँग्रेसच्या सरचिटणीस पदी विष्णू गुळवे यांची नियुक्ती करण्यात आली. महसूलमंत्री बाळासाहेब ...

Vishnu Gulve as the District General Secretary of Youth Congress | युवक काँग्रेसच्या जिल्हा सरचिटणीसपदी विष्णू गुळवे

युवक काँग्रेसच्या जिल्हा सरचिटणीसपदी विष्णू गुळवे

लोकमत न्यूज नेटवर्क

अहमदनगर: जिल्हा युवक काँग्रेसच्या सरचिटणीस पदी विष्णू गुळवे यांची नियुक्ती करण्यात आली. महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांच्या हस्ते गुळवे यांना नियुक्तीपत्र प्रदान करण्यात आले.

महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांच्या उपस्थित पक्ष कार्यालयात झालेल्या कार्यक्रमात गुळवे यांच्या नावाची घोषणा करण्यात आली. यावेळी आमदार लहू कानडे, नागवडे कारखान्याचे अध्यक्ष राजेंद्र नागवडे, जिल्हाध्यक्ष बाळासाहेब साळुंके, प्रदेशचे पदाधिकारी दीप चव्हाण, शहराध्यक्ष किरण काळे, संदीप म्हस्के आदी उपस्थित होेते. पक्ष संघटना पातळीवर करीत असलेल्या कामाची दखल घेऊन गुळवे यांची युवकच्या जिल्हा सरचिटणीस पदी नियुक्ती करण्यात आली. युवकांनी सर्वसामान्यांचे प्रश्न सोडवून त्यांच्यापर्यंत पक्षाची ध्येयधोरणे पोहचविण्याचे काम केले पाहिजे, असे थोरात यावेळी म्हणाले. नियुक्तीबाबत सांगताना गुळवे म्हणाले की, महसूलमंत्री बाळासाहेब थोरात, युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सत्यजित तांबे, जिल्हाध्यक्ष स्मितल वाबळे यांनी दिलेल्या संधीचे सोने करून पक्ष संघटना वाढविण्याचा प्रयत्न करणार असून, गाव तेथे काँग्रेस अभियान राबविणार असल्याचे ते म्हणाले.

.... फोटो: २० गुळवे नावाने आहे

फोटो ओळी : काँग्रेसच्या जिल्हा सरचिटणीसपदी नियुक्ती केल्याचे पत्र विष्णू महादेव गुळवे यांना प्रदान करताना महसूलमंत्री बाळासाहेब थोरात. समवेत युवक काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष स्मितल वाबळे, आमदार लहू कानडे, नागवडे कारखान्याचे अध्यक्ष राजेंद्र नागवडे, जिल्हाध्यक्ष बाळासाहेब साळुंके, प्रदेशचे पदाधिकारी दीप चव्हाण, शहराध्यक्ष किरण काळे, संदीप म्हस्के आदी.

Web Title: Vishnu Gulve as the District General Secretary of Youth Congress