राज्य सरकारच्या काळात महिलांवरील अत्याचार वाढले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 10, 2021 04:21 IST2021-03-10T04:21:14+5:302021-03-10T04:21:14+5:30
कोपरगाव : सध्याच्या परिस्थितीत महिलांच्या संरक्षणाचा विषय ऐरणीवर आला आहे. त्यातच महाविकास आघाडी सरकारच्या काळात महिलांवरील अत्याचाराचे प्रमाण दिवसेंदिवस ...

राज्य सरकारच्या काळात महिलांवरील अत्याचार वाढले
कोपरगाव : सध्याच्या परिस्थितीत महिलांच्या संरक्षणाचा विषय ऐरणीवर आला आहे. त्यातच महाविकास आघाडी सरकारच्या काळात महिलांवरील अत्याचाराचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत आहे, अशी खंत भाजपच्या प्रदेश सचिव माजी आमदार स्नेहलता कोल्हे यांनी व्यक्त केली.
जागतिक महिला दिनानिमित्त सोमवारी ( दि. ८ ) कोपरगाव मतदारसंघातील स्वयंसहायता महिला बचत गटांना ५५ लाखांचे कर्जवितरण कोपरगाव येथे कोल्हे यांचे हस्ते करण्यात आले. यावेळी महिला आघाडीच्या तालुकाध्यक्ष वैशाली साळुंके, शहराध्यक्ष वैशाली आढाव उपस्थित होत्या.
कोल्हे म्हणाल्या, २००२ साली सुरू केलेल्या बचत गटाच्या चळवळीमध्ये मोठया प्रमाणात महिला सहभागी झाल्या. यात सुमारे २ हजार ५०० गट कार्यरत आहे. यामुळे महिलांना मोठ्या प्रमाणात स्वयंरोजगाराची संधी निर्माण झाली. त्यांच्या जीवनात स्थैर्य प्राप्त झाले आहे. आर्थिक घडी बसली आहे, त्यामुळे तिच्या छोट्या मोठ्या गरजा पूर्ण झाल्या. या माध्यमातून अनेक महिलांनी लघुउद्योग सुरू केले. जवळजवळ दोन दशकांपासून सुरू केलेल्या या सक्षमीकरणाच्या कामात मोठे यश आल्याचे पाहून समाधान वाटते. भविष्यकाळातही बचत गटाच्या माध्यमातून उत्पादित केलेल्या वस्तूंना बाजारपेठ निर्माण करून देऊन या कामाला आणखी बळकटी देणार असल्याचा मनोदयही कोल्हे यांनी यावेळी व्यक्त केला. यावेळी बचत गटाच्या वयोवृद्ध सदस्या लक्ष्मीबाई सोळसे यांचा कोल्हे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. तसेच साधना पटारे, स्नेहल टेके, सविता ढोमसे यांनी आपले मनोगत व्यक्त केले.
फोटो०९- स्नेहलता कोल्हे