नाशिक-पुणे महामार्गावर वेगमर्यादेचे उल्लंघन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 9, 2021 04:26 IST2021-09-09T04:26:05+5:302021-09-09T04:26:05+5:30
नाशिक-पुणे महामार्गावर डोळासणे येथे महामार्ग पोलीस मदत केंद्र आहे. पोलीस उपनिरीक्षक भालचंद्र शिंदे या केंद्राचे प्रमुख आहेत. अपघाताचे प्रमाण ...

नाशिक-पुणे महामार्गावर वेगमर्यादेचे उल्लंघन
नाशिक-पुणे महामार्गावर डोळासणे येथे महामार्ग पोलीस मदत केंद्र आहे. पोलीस उपनिरीक्षक भालचंद्र शिंदे या केंद्राचे प्रमुख आहेत. अपघाताचे प्रमाण कमी करण्यासंदर्भात महामार्ग पोलिसांकडून विविध उपाययोजना करण्यात येत आहेत. वेगमर्यादेचे उल्लंघन करणाऱ्या वाहनांवर कारवाईसाठी महामार्ग पोलिसांकडे ‘इंटरसेप्टर कॅमेरे उपलब्ध असून हे महामार्ग पोलीस वाहनात मागील बाजूस हे कॅमेरे बसविण्यात आले आहेत. यात व्हिडिओ बेस्ड लेसर स्पीड मॉनिटरिंग सिस्टीम आहे. अत्याधुनिक यंत्रणेद्वारे महामार्गावरून येणाऱ्या-जाणाऱ्या वाहनांची वेगमर्यादा तपासण्यात येते. यात वाहनांचे वाहन क्रमांक, वाहनांचा वेग कॅमेऱ्यात कैद होतो. वाहनाचा अधिक वेग असल्यास संबंधित वाहनाच्या वाहन क्रमांकाशी जोडलेल्या मोबाईल क्रमांकावर वेगमर्यादेचे उल्लंघन केल्याचा संदेश आणि करण्यात आलेल्या दंडाची रक्कम संबंधित व्यक्तीला प्राप्त होते. यालाच ई-चलन असे म्हणतात.
राष्ट्रीय महामार्गावर कारसाठी कमाल ताशी ९० किलोमीटर, जड वाहनासाठी कमाल ताशी ८० किलोमीटर, दुचाकीसाठी कमाल ताशी ७० किलोमीटरची वेग मर्यादा घालून देण्यात आली आहे. ही वेगमर्यादा ओलांडल्यास ‘इंटरसेप्टर कॅमेऱ्या’द्वारे कारवाई करून स्वयंचलित पद्धतीने ई-चलन पाठविले जाते. असे डोळासणे येथील महामार्ग पोलीस मदत केंद्राचे प्रमुख, पोलीस उपनिरीक्षक भालचंद्र शिंदे यांनी सांगितले.
--------------------
महामार्गावर कोणत्या महिन्यात किती दंड
महिना कारवाईची संख्या दंडाची रक्कम
जानेवारी २२५९ २२, ५९, ०००
फेब्रुवारी १८५० १८, ५०, ०००
मार्च २०१७ २०, १७, ०००
एप्रिल ८३२ ०८, ३२, ०००
मे १२१ ०१, २१, ०००
जून ८३३ ०८, ३३, ०००
जुलै १०२६ १०, २६, ०००
ऑगस्ट ९१० ०९, १०, ०००
------------------------------------------------------
एकूण ९८४८ ९८, ४८,०००
------------------
नाशिक-पुणे महामार्गावर वेगमर्यादेचे उल्लंघन करणाऱ्या वाहनांवर कारवाई करण्यात येते. त्याचबरोबरच मद्यप्राशन करून वाहन चालविणाऱ्या वाहनचालकांवर तसेच वाहतुकीचे नियम मोडणाऱ्यांवर कारवाई करण्यात येते. वाहनचालकांनी वाहतुकीच्या नियमांचे पालन करावे. त्यामुळे अपघाताचे प्रमाण कमी होण्यास मदत होईल.
-भालचंद्र शिंदे, पोलीस उपनिरीक्षक, केंद्रप्रमुख, महामार्ग पोलीस मदत केंद्र, डोळासणे
..............
star 1145