शेवगाव तालुक्यातील गावे अंधारात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 30, 2021 04:14 IST2021-06-30T04:14:39+5:302021-06-30T04:14:39+5:30

अहमदनगर : गेल्या चार वर्षांपासून शेवगाव तालुक्यातील चेडे चांदगाव, कोनोशी, राणेगाव व बेलगावाजवळ वीज असून सुद्धा चारही गावे अंधारात ...

Villages in Shevgaon taluka are in darkness | शेवगाव तालुक्यातील गावे अंधारात

शेवगाव तालुक्यातील गावे अंधारात

अहमदनगर : गेल्या चार वर्षांपासून शेवगाव तालुक्यातील चेडे चांदगाव, कोनोशी, राणेगाव व बेलगावाजवळ वीज असून सुद्धा चारही गावे अंधारात आहेत. या गावात अक्षय प्रकाश योजना सुरू करण्याची मागणी जिल्हा परिषद सदस्य हर्षदा काकडे यांनी स्थानिक ग्रामस्थांसह जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भोसले यांच्याकडे केली आहे.

यावेळी रमेश माने, रमेश गोंधळी, शिवाजी कणसे, बाबासाहेब गोंधळी, बाळासाहेब कणसे, परमेश्‍वर गोंधळी, काकासाहेब गोंधळी, भारत गोंधळी आदी उपस्थित होते. शेवगाव तालुक्यातील चेडे चांदगाव, कोनोशी, राणेगाव व बेलगाव येथील वाडीवस्तीवर अनेक कुटुंब राहतात. त्यांना अक्षय प्रकाश योजनेचा लाभ मिळावा म्हणून नागरिकांनी वेळोवेळी शेवगाव महावितरण कार्यालयास पत्रव्यवहार केला आहे. तसा प्रस्ताव महाराष्ट्र राज्य विद्युत महामंडळ शेवगाव कार्यालयाकडून अहमदनगर येथील महाराष्ट्र राज्य विद्युत महामंडळाच्या मुख्य कार्यालयाला दिलेला आहे. परंतु त्यावर अद्याप कुठलीही कारवाई करण्यात आली नाही. या गावात वीज नसल्यामुळे नागरिकांना अंधारातच राहावे लागत आहे. त्यांच्या शाळकरी मुलांना रात्री अभ्यास करता येत नाही. तसेच घरात टीव्ही पाहता येत नाही. साधा मोबाईल चार्ज करण्यासाठी दीड ते दोन किमी अंतरावर असलेल्या मुख्य गावात जावे लागते, असे निवेदनात म्हटले आहे.

Web Title: Villages in Shevgaon taluka are in darkness