मांडवे येथे जनता कर्फ्यूला ग्रामस्थांचा प्रतिसाद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 20, 2021 04:21 IST2021-05-20T04:21:43+5:302021-05-20T04:21:43+5:30

अहमदनगर : कोरोनाचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढत आहे. नगर तालुक्यात तर मोठ्या प्रमाणात रुग्ण आहेत. तालुक्यातील मांडवे येथेही रुग्ण वाढण्याचे ...

Villagers respond to public curfew at Mandwe | मांडवे येथे जनता कर्फ्यूला ग्रामस्थांचा प्रतिसाद

मांडवे येथे जनता कर्फ्यूला ग्रामस्थांचा प्रतिसाद

अहमदनगर : कोरोनाचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढत आहे. नगर तालुक्यात तर मोठ्या प्रमाणात रुग्ण आहेत. तालुक्यातील मांडवे येथेही रुग्ण वाढण्याचे प्रमाण मोठे असल्याने ग्रामपंचायतीच्या वतीने १० दिवसांचा जनता कर्फ्यू जाहीर करण्यात आला आहे. त्याला पहिल्या दिवशी ग्रामस्थांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.

नगर तालुक्यातील मांडवा येथे सध्या कोरोनाचे अनेक रुग्ण आहेत. त्यामुळे या रुग्णांपासून कोरोनाचा संसर्ग आणखी फैलावू नये म्हणून गावात ग्रामपंचायतीतर्फे १९ ते २९ मेपर्यंत कडक बंद जाहीर करण्यात आला आहे. या काळात केवळ मेडिकल आणि दूध या सेवा सुरू राहतील. याव्यतिरिक्त सर्व व्यवहार बंद ठेवण्याचे आवाहन करण्यात आले आहे. गावातील काही भाग बांबूचे कठडे लावून बंद करण्यात आले आहेत. ग्रामस्थांनी या जनता कर्फ्यूला उत्स्फूर्त प्रतिसाद देत घरातच थांबण्याचा निर्णय घेतला आहे. पहिल्या दिवशी कोणीही अनावश्यक बाहेर फिरताना आढळले नाही. असेच पुढील दहा दिवस ग्रामस्थांनी प्रतिसाद दिला तर कोरोनाची साखळी तुटेल, असा विश्वास ग्रामपंचायत प्रशासनाला वाटत आहे. त्यादृष्टीने प्रयत्न सुरू आहेत.

--------

फोटो मेल

१९मांडवे बंद

नगर तालुक्यातील मांडवा येथे १० दिवसांचा जनता कर्फ्यू जाहीर करण्यात आला आहे.

Web Title: Villagers respond to public curfew at Mandwe