शाळेला ठोकले टाळे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 22, 2017 18:08 IST2017-08-22T18:06:02+5:302017-08-22T18:08:09+5:30
कोतूळ : अकोले तालुक्यातील जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागाच्या नमुनेदार घटना समोर येत असताना तालुक्यातील एका नमुनेदार शिक्षकाच्या ...

शाळेला ठोकले टाळे
ठळक मुद्देगावाचा एल्गारग्रामस्थांच्या व जिल्हा परिषद सदस्याच्या मागणीला केराची टोपली
क ोतूळ : अकोले तालुक्यातील जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागाच्या नमुनेदार घटना समोर येत असताना तालुक्यातील एका नमुनेदार शिक्षकाच्या करामतीचे पाढे विद्यार्थ्यांनी जिल्हा परिषद सदस्य व ग्रामस्थांसमोर वाचले. याबाबत जिल्हा परिषद शिक्षण विभागात तक्रार करूनही कारवाई न झाल्याने मंगळवारी सकाळी दहा वाजता सर्व ग्रामस्थांनी एल्गार पुकारत शाळेला टाळे ठोकले.प्राथमिक शिक्षण विभागाचा गोंधळ दुर्गम भागासाठी मात्र शाप ठरत आहे. चक्क ग्रामस्थ विद्यार्थी व जिल्हा परिषद सदस्यांच्या मागणीला केराची टोपली दाखवल्याने या विभागावर विद्यार्थ्यांनी विश्वास कसा ठेवावा हा प्रश्न निर्माण झाला आहे. कोतूळपासून २२ किलोमीटर अंतरावरील दुर्गम आदिवासी भागातील केळी बांगरवाडी या दोन शिक्षकी शाळेतील बाबूराव वसंत देशमुख नावाचे शिक्षक गेल्या वर्षभरापासून सतत गैरहजर होते. शिवाय ते कधीतरी शाळेत आले तर त्यांची ‘ ती ’ अवस्था पाहून विद्यार्थी वगार्तून पळ काढत होते. मात्र हे ‘ गुरू ’ नको म्हणून ग्रामस्थांनी गेल्या दीड वर्षीपासून शिक्षण विभागाचे उंबरे झिजविले. जिल्हा परिषद सदस्य किरण लहामटे यांच्याकडे तक्रार केली. मात्र शिक्षण विभागाने पुन्हा त्याच शिक्षकास त्याच शाळेवर पाठविण्याचा घाट घातल्याने व नविन शिक्षक न दिल्याने संतप्त ग्रामस्थांनी मंगळवारी शाळेला टाळे ठोकले. यावेळी सरपंच मंगल धराडे, उपसरपंच भीमा गोडे, सदस्य दारकू भवारी, अंजना बांगर, सखुबाई गोडे, शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष संतोष गोडे, मारुती गोडे, शंकर गोडे , लक्ष्मण बांगर, सचिन बांगर, शंकर कडू , शंकर तळपे , बापू लांडगे, बाळू वैराळ , कमलेश वाघमारे, पुनाजी गोडे आदींसह ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. ...................................फोटो २२ शाळेला कुलूपओळ: केळी बांगरवाडी (ता.अकोले) येथील शिक्षकाच्या बदलीसाठी मंगळवारी ग्रामस्थांनी शाळेला टाळे ठोकले.