ग्रामस्थांनी केला कृषी सहाय्यकांचा सन्मान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 14, 2021 04:25 IST2021-08-14T04:25:56+5:302021-08-14T04:25:56+5:30

दहिगावने : शेवगाव तालुक्यातील ढोरसडे-अंत्रे, देवटाकळी गावाचे कृषी सहायक आदिनाथ कुंढारे यांची प्रशासकीय बदली आव्हाणे बुद्रूक येथे झाली. त्यांच्या ...

The villagers honored the agricultural assistants | ग्रामस्थांनी केला कृषी सहाय्यकांचा सन्मान

ग्रामस्थांनी केला कृषी सहाय्यकांचा सन्मान

दहिगावने : शेवगाव तालुक्यातील ढोरसडे-अंत्रे, देवटाकळी गावाचे कृषी सहायक आदिनाथ कुंढारे यांची प्रशासकीय बदली आव्हाणे बुद्रूक येथे झाली. त्यांच्या जागी प्रतिभा उभेदळ यांनी कृषी सहायक पदाचा पदभार स्वीकारला. दोनही कृषी सहायकांचा ढोरसडे-अंत्रे व देवटाकळी ग्रामस्थांनी सन्मान करून पुढील कार्यास शुभेच्छा दिल्या. तालुक्यातील बारमाही बागायती भाग म्हणून ओळख असलेल्या या गावात आधुनिक पद्धतीने शेती केली जाते. अशा वेळी विविध शासकीय योजना प्रभावीपणे राबविण्यासाठी शेतकऱ्यांना मार्गदर्शन करण्यासाठी कार्यतत्पर अधिकारी म्हणून कुंढारे यांनी आपली ओळख निर्माण केल्याची भावना ग्रामस्थांनी व्यक्त करत अशाच प्रकारचा कारभार प्रतिभा उभेदळ यांच्याकडूनही होईल, असा विश्वास व्यक्त केला. यावेळी सरपंच, उपसरपंच, प्रगतशिल शेतकरी, ग्रामपंचायत सदस्य, सेवा संस्थांचे व विविध संघटनांचे पदाधिकारी उपस्थित होते.

130821\img-20210813-wa0025.jpg

फोटो - शेवगाव तालुक्यातील ढोरसडे-अंत्रे व देवटाकळीचे कृषीसहायक आदिनाथ कुंढारे यांचा ढोरसडे-अंत्रेचे माजी सरपंच गुरुनाथ माळवदे यांनी सन्मान केला.

Web Title: The villagers honored the agricultural assistants

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.