दत्तनगर येथे ग्रामस्थांच्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 21, 2021 04:21 IST2021-05-21T04:21:40+5:302021-05-21T04:21:40+5:30

श्रीरामपूर : तालुक्यातील दत्तनगर येथे एमआयडीसीतील इंद्रप्रस्थ मंगल कार्यालयामध्ये ग्रामपंचायत सदस्य व ग्रामस्थ यांच्या सहकार्याने संजय उर्फ काकासाहेब शिंदे ...

Of the villagers at Duttnagar | दत्तनगर येथे ग्रामस्थांच्या

दत्तनगर येथे ग्रामस्थांच्या

श्रीरामपूर : तालुक्यातील दत्तनगर येथे एमआयडीसीतील इंद्रप्रस्थ मंगल कार्यालयामध्ये ग्रामपंचायत सदस्य व ग्रामस्थ यांच्या सहकार्याने संजय उर्फ काकासाहेब शिंदे यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ सुरू करण्यात आलेल्या कोविड सेंटरचे उद्घाटन तहसीलदार प्रशांत पाटील यांच्या हस्ते झाले.

तालुका आरोग्य अधिकारी डॉ. मोहन शिंदे, सभापती संगीता शिंदे, जि.प. अर्थ समितीचे माजी सभापती बाबासाहेब दिघे, माजी सरपंच नानासाहेब शिंदे, जि.प. सदस्या आशा दिघे, सरपंच सुनील शिरसाठ, उपसरपंच सारिका कुंकूलोळ, खादी ग्रामोद्योगचे अध्यक्ष प्रेमचंद कुंकूलोळ, भीमा बागुल, पी.एस. निकम, रवींद्र गायकवाड, बाळासाहेब दिघे, शरद भणगे, ग्रा. विकास अधिकारी विजय धाकतोेडे उपस्थित होते.

कोविड केअर सेंटरमध्ये डॉक्टर व परिचारिका यांच्या देखरेखीखाली रुग्णांवर मोफत उपचार करण्यात येणार आहेत. रुग्णांच्या नास्त्याची व दोन वेळच्या जेवणाची व्यवस्था संयोजकांनी मोफत केली आहे. या सेवेचा लाभ दत्तनगर ग्रामस्थांनी घेऊन कोरोनाला प्रतिबंध करावा, असे आवाहन पंचायत समितीच्या व बाजार समितीच्या प्रदीप गायकवाड, शाहजान बागवान, जनार्दन खाजेकर, हिरामण जाधव, मोहन आव्हाड आदींनी केले आहे.

--------

Web Title: Of the villagers at Duttnagar