ऐन थंडीत संगमनेर तालुक्यात गावगाडा तापणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 16, 2020 04:35 IST2020-12-16T04:35:28+5:302020-12-16T04:35:28+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क संगमनेर : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सहा महिने पुढे ढकललेल्या ग्रामपंचायतींच्या निवडणुकीचा बिगुल वाजला आहे. एप्रिल ते डिसेंबर ...

The village will be heated in Sangamner taluka in cold weather | ऐन थंडीत संगमनेर तालुक्यात गावगाडा तापणार

ऐन थंडीत संगमनेर तालुक्यात गावगाडा तापणार

लोकमत न्यूज नेटवर्क

संगमनेर : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सहा महिने पुढे ढकललेल्या ग्रामपंचायतींच्या निवडणुकीचा बिगुल वाजला आहे. एप्रिल ते डिसेंबर २०२० या कालावधीत मुदत संपणाऱ्या संगमनेर तालुक्यातील ९४ ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकीकरिता संगणकीकृत पद्धतीने राबविण्यात येणाऱ्या निवडणुकीच्या कार्यक्रमाला सुरुवात झाली असून, ऐन थंडीत संगमनेर तालुक्यात गावगाडा तापणार आहे.

संगमनेर तालुक्यातील १४३ ग्रामपंचायतींपैकी ९४ ग्रामपंचायतींची निवडणूक होत आहे. या तालुक्यातील २६ गावे शिर्डी विधानसभा मतदारसंघाला, तर २५ गावे अकोले विधानसभा मतदारसंघाला जोडली आहेत. शिर्डी विधानसभा मतदारसंघातील १४ गावांमध्ये ग्रामपंचायतींची निवडणूक होत आहे. काँग्रेस प्रदेशाध्यक्ष महसूलंमत्री बाळासाहेब थोरात यांचा तालुका व माजी मंत्री, भाजपचे नेते आमदार राधाकृष्ण विखे यांच्या शिर्डी विधानसभा मतदारसंघातील १४ गावांतील निवडणुकीमध्ये मोठी चुरस पाहायला मिळेल. या मतदारसंघाला जोडल्या गेलेल्या २८ गावांमधील निवडणूक पूर्वी थोरात विरुद्ध विखे, अशा दोन गटांत होत होती. या गावांमधील राजकीय वातावरण नेहमीच तापलेले असते. तालुक्यातील बहुतांशी ग्रामपंचायतींमध्ये महसूलमंत्री थोरातांचे वर्चस्व आहे.

थोरात आणि विखे या राज्यातील दोन मातब्बर नेत्यांमधील राजकीय संघर्षाकडे राज्याचे लक्ष लागलेले असते. या नेत्यांमधील राजकीय वैर राज्याला परिचित असून, आमदार विखे पाटील कॉँग्रेसमध्ये असतानाही त्यांच्यात संघर्ष तीव्र होता. आता ते भाजपमध्ये असल्याने थोरात विरुद्ध विखे संघर्षाची धार अधिकच तीव्र झाल्याने शिर्डी मतदारसंघातील १४ गावांमधील निवडणूक कॉँग्रेस विरुद्ध भाजप अशीच होईल. संगमनेर तालुक्यातील थोरात विरोधकांची मोट खासदार डॉ. सुजय विखे बांधणार का? इतर गावांच्या ग्रामपंचायतींच्या निवडणुकीतही ते लक्ष केंद्रित करणार का? याकडेही अनेकांचे लक्ष लागले आहे. २०२० या वर्षाला निरोप देताना २०२१ या नव्या वर्षाचे स्वागत करताना संगमनेर तालुक्याच्या ग्रामीण भागात निवडणुकीची धामधूम पाहायला मिळणार आहे.

शिर्डी विधानसभा मतदारसंघातील गावे

कनोली, प्रिपीं लौकी, आजमपूर, चिंचपूर खुर्द, चणेगाव, झरेकाठी, पानोडी, प्रतापपूर, शेडगाव, ओझर बु., औरंगपूर, खळी, दाढ खुर्द, शिबलापूर व मनोली या शिर्डी मतदारसंघातील १४ ग्रामपंचायींच्या निवडणुका होत आहेत.

अकोले विधानसभा मतदारसंघातील गावे

संगमनेर तालुक्यातील पठार भागातील अकलापूर, बोटा, पिंपळगाव माथा, खंदरमाळवाडी, नांदूरखंदरमाळ, पिंपळगाव देपा, कौठ बु., भोजदरी, माळेगाव पठार, म्हसवंडी, कुरकुंडी, आंबीखालसा, कौठे खु. आंबीदुमाला, कुरकूटवाडी, वनकुटे, पोखरी बाळेश्वर, वरुडीपठार, सावरगाव घुले, जवळेबाळेश्वर, महालवाडी या २१ गावांतील ग्रामपंचायतींच्या निवडणूक होत आहे. ही गावे अकोले विधानसभा मतदारसंघाला जोडली गेली आहेत. येथील जिल्हा परिषद सदस्य म्हणून कॉँग्रेसचे अजय फटांगरे आहेत.

संगमनेर विधानसभा मतदारसंघातील गावे

कऱ्हे, पारेगाव खु., लोहारे, पळसखेडे, सोनेवाडी, वेल्होळे, जवळे कडलग, कासारा-दुमाला, राजापूर, निमगाव बु., निमगाव खुर्द, पेमगिरी, खांडगाव, जाखुरी, देवगाव, हिवरगाव पावसा, रायतेवाडी, कुरण, समनापूर, तिगाव, कोकणगाव, खांबे, मिरपूर, पिंपळे, देवकौठे, पारेगाव बु., कासारे, चिखली, मंगळापूर, वडगाव लांडगा, शिरसगाव धुपे, सावरचोळ, सांगवी, कौठे धांदरफळ, मिझार्पूर, नांदुरी दुमाला, डिग्रस, रायते, निमगाव टेंभी, शिरापूर, संगमनेर खुर्द, चंदनापुरी, झोळे, कोंची-मांची, माळेगाव हवेली, सुकेवाडी, सावरगाव तळ, शिंदोडी, वडगावपान, मालदाड, सोनोशी, कौठे मलकापूर, हिवरगावपठार, खरशिंदे, शेंडेवाडी, वरंवडी, मेंढवण, कौठे कमळेश्वर व खांजापूर या संगमनेर विधानसभा मतदारसंघातील ५९ गावांमधील ग्रामपंचायतींची निवडणूक होत आहे.

Web Title: The village will be heated in Sangamner taluka in cold weather

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.