बहिरवाडी गावात ग्रामसुरक्षा यंत्रणा कार्यान्वित
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 29, 2021 04:15 IST2021-06-29T04:15:29+5:302021-06-29T04:15:29+5:30
केडगाव : नगर तालुक्यातील बहिरवाडी गावात ग्रामसुरक्षा यंत्रणा कार्यान्वित झाली असून यामुळे आपत्कालीन परिस्थितीत गावातील शेकडो लोकांना संदेश मिळणार ...

बहिरवाडी गावात ग्रामसुरक्षा यंत्रणा कार्यान्वित
केडगाव : नगर तालुक्यातील बहिरवाडी गावात ग्रामसुरक्षा यंत्रणा कार्यान्वित झाली असून यामुळे आपत्कालीन परिस्थितीत गावातील शेकडो लोकांना संदेश मिळणार आहे.
बहिरवाडी गाव हे गर्भगिरीच्या डोंगररांगांमध्ये वसलेले आहे. या गावात एमआयडीसी पोलिसांच्या पुढाकारातून ग्रामसुरक्षा यंत्रणा कार्यान्वित करण्यात आली आहे. या यंत्रणेमुळे गावात काही अनुचित प्रकार घडल्यास त्याचा संदेश तत्काळ गावातील शेकडो ग्रामस्थांना समजणार आहे. अनुचित प्रकार तसेच सतर्कतेचा इशारा देण्यासाठी फक्त एका टोल फ्री क्रमांकावर फोन करून कल्पना दिल्यानंतर ही यंत्रणा कार्यान्वित होऊन संपूर्ण गावाला घटनेची माहिती मिळणार आहे. ग्रामसुरक्षा यंत्रणा कार्यान्वित झाल्याने ग्रामस्थांमध्ये समाधानाचे वातावरण आहे.
---
गावातील अनुचित प्रकार तसेच सतर्कतेचा संदेश ग्रामसुरक्षा यंत्रणेमुळे ग्रामस्थांना तत्काळ समजणार आहे. या यंत्रणेमुळे गावात गुन्हेगारांवर अंकुश राहणार आहे.
-अंजना येवले,
सरपंच, बहिरवाडी