नेवासा : संत गाडगेबाबा यांच्या जयंतीनिमित्त नेवासा काँग्रेसच्या वतीने तालुक्यात विविध ठिकाणी स्वच्छता अभियान राबवण्यात आले.
तालुक्यातील भानसहिवरा येथील ऐतिहासिक कविजंगबाबा गढी परिसरात स्वच्छता अभियान राबवून ग्राम स्वच्छता सप्ताहास प्रारंभ करण्यात आला.
यावेळी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष संभाजी माळवदे म्हणाले, गाडगेबाबा यांनी महाराष्ट्रात खेडोपाडी जाऊन कीर्तनातून समाजातील दारिद्र्य, जातीभेदामुळे निर्माण होणारी विषमता तसेच देवभोळेपणा यावर वार करून जनजागृती केली.
जिल्हा सचिव सुदामराव कदम म्हणाले, गाडगेबाबा यांनी आपले संपूर्ण जीवन अज्ञान, अंधश्रद्धा, भोळ्या समजुती, अनिष्ट प्रथा, रुढी दूर करण्यासाठी वेचले. त्यासाठी कीर्तन मार्ग अवलंबला. यावेळी काँग्रेसचे जिल्हा उपाध्यक्ष कार्लस साठे, शहराध्यक्ष, रंजन जाधव, उपाध्यक्ष सुनील भोंगे, एनएसयूआयचे अध्यक्ष सौरभ कसावणे, समीर शेख, अस्लम सय्यद, सागर वंजारे, सचिन बोर्डे, सरचिटणीस प्रवीण तिरोडकर, संघटक संदीप मोटे, एससी विभाग अध्यक्ष नंदू कांबळे, एससी विभाग जिल्हा कार्याध्यक्ष कमलेश गायकवाड, अल्पसंख्याक अध्यक्ष तन्वीर शेख, सुरेंद्र मंडलिक, चंद्रकांत पवार आदींसह काँग्रेस कार्यकर्ते उपस्थित होते.