म्हसे येथे ग्रामस्वच्छता मोहीम

By | Updated: December 8, 2020 04:19 IST2020-12-08T04:19:03+5:302020-12-08T04:19:03+5:30

ढवळगाव : वंचित बहुजन आघाडीच्या वतीने श्रीगोंदा तालुक्यातील म्हसे येथे भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त गावात स्वच्छता ...

Village cleaning campaign at Mhase | म्हसे येथे ग्रामस्वच्छता मोहीम

म्हसे येथे ग्रामस्वच्छता मोहीम

ढवळगाव : वंचित बहुजन आघाडीच्या वतीने श्रीगोंदा तालुक्यातील म्हसे येथे भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त गावात स्वच्छता अभियान राबवून त्यांना अनोखे अभिवादन करण्यात आले.

ग्रामपंचायत कार्यालयात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करण्यात आला. त्यानंतर स्वच्छता अभियान राबविण्यात आले. यावेळी वंचित बहुजन आघाडीचे युवक तालुकाध्यक्ष सुखदेव फाजगे, माजी तालुकाध्यक्ष संतोष जौंजाळ, रवी जौजाळ, अक्षय फाजगे, मिठूभाई शेख, नवनाथ देविकर, सोमनाथ खेडकर, दीपक देवकर, तुषार देविकर, राजू फाजगे, बाळा फाजगे, विजय जौजाळ, रोहित शिंदे, सुनील फाजगे, सागर शिंदे, प्रकाश जौजाळ, विशाल शिंदे, सोमनाथ पठारे, विशाल साळवे, बाळू मोरे, एकनाथ फाजगे, दौलत फाजगे, नागेश गव्हाणे, तेजस जौजाळ, अश्विन जौजाळ, विशाल फाजगे, अमोल फाजगे आदी सहभागी झाले होते.

फोटो : ०७ म्हसे

म्हसे (ता.श्रीगोंदा) येथे ग्रामस्वच्छता करताना ग्रामस्थ.

Web Title: Village cleaning campaign at Mhase