शहरं
Join us  
Trending Stories
1
भारत-पाकिस्तान संघर्ष रोखला तसा इराण-इस्त्रायल युद्ध थांबवणार; डोनाल्ड ट्रम्प यांचा दावा
2
Viral Video : किती तो लग्नाचा आनंद! नवरदेवाचा 'असा' भन्नाट उत्स्फूर्त डान्स कधी पाहिलाच नसेल!
3
भाजप नेत्यांनी संघासमोर मांडला निवडणुकीच्या तयारीचा रोडमॅप; मुख्यमंत्री, गडकरींची उपस्थिती
4
Bridge Collapses : पूल दुर्घटनेबाबत अमित शाहांनंतर PM नरेंद्र मोदींचाही CM देवेंद्र फडणवीसांना फोन
5
Bridge Collapses: सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अक्षम्य दुर्लक्षामुळे कुंडमाळा येथे निष्पाप बळी 
6
इराणची राजधानी तेहरान हादरली: इस्रायलचे एकामागोमाग एक हल्ले; नागरिक भयभीत!
7
जावयाने केली सासऱ्याची हत्या, गडचिरोली जिल्ह्यातील घटना, आरोपीला अटक
8
विमान क्रॅश होण्याआधी दिसलेला 'तो' छोटा डॉट बनलं रहस्य?; तज्ज्ञांनी सांगितली 'RAT' ची थेअरी
9
गडचिरोलीच्या विद्यार्थ्यांचे 'इस्रो'ला ऐतिहासिक उड्डाण, मुख्यमंत्र्यांकडून विद्यार्थ्यांना शुभेच्छा
10
पूल दुर्घटनेच्या कारणांची चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करणार - उपमुख्यमंत्री अजित पवार
11
Bridge Collapses: दुर्घटनेत वाचलेले गणेश पवार म्हणाले, पूल कोसळला तेव्हा मी खाली पडलो मात्र, वाचलो..!
12
हातातला मोबाईल आधी बाजुला ठेवा मगच आरामात जेवा, नाहीतर वाढेल ब्लड शुगर आणि वजन
13
Pune Bridge Collapse: 'आज बोलण्याचा दिवस नाही तर जखमींना मदत' रोहित पवार यांचं मावळ दुर्घटनेवर भाष्य
14
गर्लफ्रेंडने बोलणं टाकलं, बॉयफ्रेंडचं डोकं सटकलं; प्रेयसीच्या घराबाहेरच स्वतःला पेटवलं!
15
AC बंद, ५ तास लहान मुलं, वृद्ध गरमीने हैराण; एअर इंडियाच्या विमानाचा धक्कादायक Video
16
१५ वर्ष भारतीय सेनेत देशसेवा केली, केदारनाथ हेलिकॉप्टर दुर्घटनेत आला मृत्यू; कोण होते पायलट राजवीर सिंह?
17
कुंडमळा पूल दुर्घटनेनंतर सुप्रिया सुळे घटनास्थळी; जखमींना दिला धीर, मदतीचे निर्देश
18
नागरिकांनी अपघाताची केली होती, शक्यता व्यक्त;सार्वजनिक बांधकाम विभाग प्रशासनाने केले दुर्लक्ष
19
राजकोट किल्ल्यावरील शिवरायांच्या पुतळ्याला पुन्हा धोका?; चबुतऱ्याजवळील माती खचली
20
Pune Bridge Collapse: पूल दुर्घटनेत २ मृत्यू, ३२ जखमी, ६ जणांना वाचवले, मात्र आणखी काही...; CM देवेंद्र फडणवीस काय म्हणाले?

विखेंनी आम्हाला चॅलेंज देऊ नये-राम शिंदे; पराभवाच्या अहवालात सर्व काही स्पष्ट होईल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 19, 2020 17:31 IST

पक्ष हा काही कोणाची बापजादाची इस्टेट नाही. जनाधारामुळे सर्व पदे मी भोगली. पक्षाने मला न्याय दिला. केवळ हे फक्त भाजपमध्येच घडू शकते, असे सांगून माजीमंत्री प्रा.राम शिंदे यांनी खासदार डॉ.सुजय विखे यांना टोला लगावला.

अहमदनगर : भाजप संघटनात्मक पातळीवर कमी पडलेला आहे. पराभवाचे कारणे शोधणारा चौकशी अहवाल वरिष्ठांना सादर होईल, त्यामध्ये सर्व काही स्पष्ट होईल. माझे वडील काही खासदार, आमदार, मुख्यमंत्री नव्हते. त्यामुळे मला चॅलेंज करायचा प्रश्नच नाही. पक्ष हा काही कोणाची बापजादाची इस्टेट नाही. जनाधारामुळे सर्व पदे मी भोगली. पक्षाने मला न्याय दिला. केवळ हे फक्त भाजपमध्येच घडू शकते, असे सांगून माजीमंत्री प्रा.राम शिंदे यांनी खासदार डॉ.सुजय विखे यांना टोला लगावला.भाजप उमेदवाराच्या पराभवाला जबाबदार असल्याचे एक तरी उदाहरण सांगा, असे आवाहन खासदार डॉ. सुजय विखे यांनी केले होते. याबाबत विचारलेल्या प्रश्नावर प्रा शिंदे यांनी थेट हल्लाबोल केला. सावेडी येथील संपर्क कार्यालयात रविवारी शिंदे बोलत होते. यावेळी माजी जिल्हाध्यक्ष प्रा.भानुदास बेरड, शहर जिल्हाध्यक्ष भैय्या गंधे, दक्षिण जिल्हाध्यक्ष अरुण मुंडे उपस्थित होते. प्रा. शिंदे म्हणाले,  भाजपने विशेष बैठक बोलावून एकत्र ऐकून घेतले होते. याचा अर्थ कोणताही समेट झालेला नाही. पक्षाच्या वरिष्ठांकडे अहवाल आल्यानंतर त्यामध्ये पराभवाची कारणे स्पष्ट होतील. जिल्हा विभाजनासाठी प्रामाणिक प्रयत्न केले. सरकारमध्ये असताना बाजू मांडली. मात्र नगर जिल्ह्यासह सहा ते सात जिल्ह्यांचे जिल्हा विभाजनाचे प्रस्ताव होते. त्याचा खर्च मोठा होता. निवडणूक तोंडावर होती. एका जिल्ह्याचे विभाजन झाले असते तर दुसºया जिल्ह्यात नाराजी झाली असती. त्यामुळे विभाजन झाले नाही. आता जिल्ह्यात तीन मंत्री आहेत, त्यामुळे जिल्हा विभाजनाचा मुद्दा उपस्थित होऊ शकतो. उत्तरेचे मुख्यालय काय असावे, हे सरकार ठरवेल. आधी खात्यावरून, नंतर बंगले, दालने यावरून सरकारचा तब्बल ५२ दिवस गोंधळ सुरू होता. यामध्ये जिल्ह्याला उशिरा पालकमंत्री मिळाले. अन्य जिल्ह्यात पालकमंत्र्यांनी आढावा बैठका घेतला. नगरला यायला पालकमंत्र्यांना उशिरा मुहुर्त मिळाला. नगर जिल्ह्याचे पालकमंत्रीपद राष्ट्रवादीच्या कोट्यात असल्याने ते आपल्याला मिळणार नाही, याची जाणीव असल्यानेच बाळासाहेब थोरात यांनी आधीपासूनच पालकमंत्रीपद घेण्यास नकार दिला होता. त्यामुळे त्यांनी मिळालेले कोल्हापूरचे पालकमंत्रीपदही नाकारले.

टॅग्स :AhmednagarअहमदनगरJamkhedजामखेडRam Shindeराम शिंदेPoliticsराजकारण