विखे-कर्डिले समझोता एक्सप्रेस धावणार....
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 30, 2020 12:16 IST2020-06-30T12:16:07+5:302020-06-30T12:16:12+5:30
अहमदनगर : नगर-राहुरी मतदारसंघात खासदार सुजय विखे व माजी आमदार शिवाजी कर्डिले यांची समझोता एक्सप्रेस पुन्ह नव्या दमाने धावणार आहे. यासाठी सर्व कार्यकर्त्यांनी भाजपच्या आचारसंहितेचे पालन करण्याचे आवाहन खासदार सुजय विखे यांनी केले. जेऊर जिल्हा परिषद गटातील निवडक कार्यकर्त्यांची बैठक सोमवारी घेतली. यावेळी खा. विखे बोलत होते.

विखे-कर्डिले समझोता एक्सप्रेस धावणार....
अहमदनगर : नगर-राहुरी मतदारसंघात खासदार सुजय विखे व माजी आमदार शिवाजी कर्डिले यांची समझोता एक्सप्रेस पुन्ह नव्या दमाने धावणार आहे. यासाठी सर्व कार्यकर्त्यांनी भाजपच्या आचारसंहितेचे पालन करण्याचे आवाहन खासदार सुजय विखे यांनी केले.
जेऊर जिल्हा परिषद गटातील निवडक कार्यकर्त्यांची बैठक सोमवारी घेतली.
यावेळी खा. विखे बोलत होते. आपसातील गट-तट, मतभेद विसरुन पक्ष संघटना वाढीसाठी एकजुटीने काम करा. कर्डिले व खा.विखे हे एकत्रित मतदारसंघाचा दौरा करणार आहेत. यापुढे पक्षाशी एकनिष्ठ न राहणाºयाला माझ्याकडे कोणताही थारा मिळणार नसल्याचे खा.विखे यांनी स्पष्ट केले.
कर्डिले व मी सोबत पक्षाचे संघटन करणार आहे. त्याबद्दल कोणीही मनात शंका बाळगू नये. विधानसभेच्या निवडणुकीत ज्यांनी पक्षविरोधात काम केले ,त्यांना यापुढे संघटनेत थारा देण्यात येणार नाही. सर्वसामान्यांच्या समस्या सोडविण्यास मी कटिबध्द आहे. आगामी ग्रामपंचायत, पंचायत समिती, जिल्हा परिषद व इतर निवडणुकांबाबत रणनीती ठरविण्यात येणार आहे. निर्णय घेताना स्थानिक भारतीय जनता पक्षाच्या पदाधिका-याला विश्वासात घेऊन निर्णय घेण्यात येणार आहेत. कार्यकर्त्यांनी नविन जोमाने पक्ष संघटना वाढीसाठी कामाला लागावे, असे आवाहन त्यांनी केले.
याप्रसंगी इंद्रभान वीरकर, विकास कोथिंबीरे, मच्छिंद्र कराळे, गणेश पवार, राजेंद्र दारकुंडे, चिंटू पवार, आप्पा बनकर, शैलेश सदावर्ते, सचिन वरखड, सोपान आव्हाड, दत्तात्रय बनकर, गणेश तवले, राजेंद्र तोडमल, अंतुभाऊ वारुळे, राहुल आल्हाट उपस्थित होते.