विखेंनी भाजपशी संपर्क साधला नाही : रावसाहेब दानवे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 5, 2019 13:09 IST2019-03-05T13:09:41+5:302019-03-05T13:09:43+5:30
विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे आणि सुजय विखे यांनी अद्याप भारतीय जनता पक्षाशी कोणताही संपर्क साधलेला नाही.

विखेंनी भाजपशी संपर्क साधला नाही : रावसाहेब दानवे
अहमदनगर : विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे आणि सुजय विखे यांनी अद्याप भारतीय जनता पक्षाशी कोणताही संपर्क साधलेला नाही. भाजपाचा कोणताही नेता त्यांच्या संपर्कात नसल्याची माहिती प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांनी दिली.
भारतीय जनता पार्टीचे प्रदेशाध्यक्ष खासदार रावसाहेब दानवे यांनी आज नगरमध्ये ही माहिती दिली.
दानवे म्हणाले, विखेंकडून हे फक्त दबावतंत्र सुरु आहे. भाजप, काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस सर्वच पक्षांवर ते उमेदवारीसाठी दबावतंत्र आणत आहेत. माझी त्यांची भेटही झालेली नाही. त्यामुळे विखे पितापुत्रांच्या भाजप पक्ष प्रवेशाच्या बातम्या फक्त राजकीय चर्चाच आहेत.