भिंगार छावणी परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी विद्याधर पवार यांना कोरोनाची लागण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 24, 2020 11:56 IST2020-07-24T11:55:32+5:302020-07-24T11:56:20+5:30

अहमदनगर शहरातील भिंगार छावणी परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी विद्याधर पवार यांना कोरोनाची लागण झाली आहे.   त्यांच्यावर नगर येथील खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. 

Vidyadhar Pawar, chief executive officer of the cantonment council, was infected with corona | भिंगार छावणी परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी विद्याधर पवार यांना कोरोनाची लागण

भिंगार छावणी परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी विद्याधर पवार यांना कोरोनाची लागण

भिंगार : अहमदनगर शहरातील भिंगार छावणी परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी विद्याधर पवार यांना कोरोनाची लागण झाली आहे.   त्यांच्यावर नगर येथील खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. 

भिंगार शहरात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढला आहे. मागील रविवारी भिंगार छावणी परिषदेचे सहा कर्मचारी कोरोना पॉझिटिव्ह आढळून आले होते. यामुळे पवार यांचीही कोरोना चाचणी करण्यात आली होती. त्यात पवार यांचा अहवाल कोरोना पॉझिटिव्ह आला आहे. 

विद्याधर पवार यांचा मुख्य कार्यकारी अधिकारी पदाचा पदभार तात्पुरत्या स्वरूपात औरंगाबाद छावणी परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी विक्रांत मोरे यांच्याकडे सोपविण्यात आला आहे.

  पवार यांच्या अनुपस्थितीमध्ये प्रशासन व रुग्णालयातील अन्य अधिकारी, कर्मचारी भिंगारमधील नागरिकांची योग्य ती काळजी घेत आहेत. 
 

Web Title: Vidyadhar Pawar, chief executive officer of the cantonment council, was infected with corona