शहरं
Join us  
Trending Stories
1
आता पाण्याच्या थेंबा-थेंबासाठी तरसणार पाकिस्तान! पहलगामनंतर भारताचे 'वॉटर स्ट्राइक'; सिंधू जल करार स्थगित
2
अटारी चेकपोस्ट बंद, पाक नागरिकांचे व्हिसा रद्द, ४८ तासात देश सोडण्याचे आदेश; भारताची कठोर भूमिका
3
"तुम्ही हर-हर महादेव म्हणत संघटित तर होऊ शकत नाही, मग अल्लाह हू अकबर म्हणत..."; मनोज मुंतशिर भडकले
4
पहलगाम हल्ल्यातील दहशतवाद्यांची माहिती देणाऱ्यांना 'इतक्या' लाखांचे बक्षीस; काश्मीर पोलिसांची घोषणा
5
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारताच्या बाजूने उभे राहिले हे मुस्लीम देश, काय म्हणतोय पाकिस्तान?
6
दुर्गम भाग, सुरक्षा व्यवस्था नाही...दहशतवाद्यांनी हल्ल्यासाठी पहलगाम का निवडले?
7
पहलगाम हल्ल्यानंतर PM मोदींच्या नेतृत्वात CCSची अडीच तास बैठक, पाकिस्तानला मोठा दणका
8
पहलगाम हल्ला: पाकिस्तानी क्रिकेटरनेच काढली पाकिस्तानची लक्तरं, म्हणाला- लाज वाटते...
9
"तू बाहर आ..."; दहशतवाद्यांनी आयत म्हणायला सांगितली, मग व्यावसायिकावर गोळ्या झाडल्या, मुलीनं सांगितला भयावह प्रसंग
10
पहलगाम हल्ल्यानंतर काश्मीरमध्ये मोठी कारवाई; 1500 लोकांना घेतले ताब्यात, चौकशी सुरू...
11
Pahalgam Terror Attack: मॅच आधी खेळाडूंनी दहशतवादी हल्ल्यातील मृत पर्यटकांना वाहिली श्रद्धांजली
12
बिल क्लिंटन भारतात येण्यापूर्वी झाली होती ३६ शीखांची हत्या; २५ वर्षांनी पहलगाममध्येही तेच घडलं
13
Pahalgam Terror Attack : सुट्टी घेऊन अमेरिकेहून काश्मीर फिरण्यासाठी आला अन् दहशतवादी हल्ल्यात जीव गमावला
14
पहलगाम हल्यामुळे काश्मीरच्या अर्थव्यवस्थेला फटका; पर्यटकांनी रद्द केल्या बुकिंग्स...
15
पहलगाम हल्ला: २४ तासांनंतर बांगलादेशची पहिली प्रतिक्रिया आली; मोहम्मद युनूस म्हणाले...
16
कुलगाममध्ये मोठी चकमक सुरु; पहलगाममध्ये हल्ला करणाऱ्या टीआरएफच्या कमांडरला घेरले
17
"निष्पाप भारतीयांना मारणं हाच पाकिस्तानचा राष्ट्रीय खेळ, आता..."; भारतीय क्रिकेटरला राग अनावर
18
“पंतप्रधानांनी खंबीर भूमिका घ्यावी, २६चा बदला २६०ने घेतला पाहिजे”; शिंदेसेनेचे नेते संतापले
19
"हे सरकार हिंदुत्वाबद्दल बोलतंय, त्यामुळे मुस्लिमांना कमकुवत झाल्यासारखं वाटतंय"; 'पहलगाम'बाबत रॉबर्ट वाड्रा यांचं विधान चर्चेत
20
"यांचा सामना कसा करायचा? भारताला चांगलं ठाऊक, आम्हीही सोबत...!"; पहलगाम हल्ल्यानंतर भारताच्या खास मित्राचं आश्वासन

अहिल्यानगर जिल्ह्यात महाविकास आघाडीतील दिग्गजांना पराभवाचा धक्का! थोरात, गडाख, तनपुरे, भांगरे पराभूत

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 23, 2024 15:28 IST

Assembly Election 2024 Result Live Updates : अहिल्यानगर जिल्ह्यातील १२ विधानसभा मतदारसंघात महाविकास आघाडीचा सुफडा साफ झाल्याचे चित्र पाहायला मिळत आहे.

Assembly Election 2024 Result Live Updates : महाराष्ट्राच्या विधानसभेच्या २८८ जागांसाठी मतमोजणी सुरू आहे. दुपारी ३ वाजेपर्यंतच्या मतमोजणीनुसार महायुतीने जोरदार मुसंडी मारल्याचे पाहायला मिळत आहे. भाजपला १३०, शिवसेनाला ५५, अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसला ४० जागांवर आघाडी मिळाली आहे. तर महाविकास आघाडीची जोरदार पिछेहाट होताना दिसत आहे. दरम्यान, अहिल्यानगर जिल्ह्यात महाविकास आघाडीचा सुफडा साफ झाला आहे. बाळासाहेब थोरात यांच्यासह अनेक दिग्गज नेत्यांना या निवडणुकीत पराभवाचा धक्का सहन करावा लागला आहे.

अहिल्यानगर जिल्ह्यात महायुतीचे वर्चस्व दिसून आले आहे, महाविकास आघाडीचे दिग्गज उमेदवार पराभूत झाले असून अनेक धक्कादायक निकाल समोर आले आहेत. नगर शहर विधानसभा मतदारसंघात यावेळी महायुतीकडून अजित पवार गटाचे विद्यमान आमदार संग्राम भैय्या जगताप आणि महाविकास आघाडी कडून शरद पवार गटाचे अभिषेक कळमकर हे निवडणुकीच्या रिंगणात होते. मात्र, येथून अजित पवार गटाचे संग्राम भैय्या जगताप यांनी विजय मिळवला आहे. अवघ्या राज्याचे लक्ष लागलेल्या राहाता मतदारसंघातून भाजपचे जेष्ठ नेते तथा महसूलमंत्री राधाकृष्ण विखे पाटील हे विजयी झाले आहेत. या ठिकाणी त्यांना प्रभावती घोगरे यांनी चांगलीच लढत दिली.

एकमेकांवरील आरोप-प्रत्यारोपांनी गाजलेल्या संगमनेर विधानसभा निवडणुकीचा निकाल हाती आला असून गेल्या चार दशकांपासून या मतदारसंघावर निर्विवाद वर्चस्व गाजवणार्‍या माजीमंत्री बाळासाहेब थोरात यांना यावेळी पराभवाचा धक्का बसला आहे. महायुतीचे उमेदवार विठ्ठलराव लंघे (शिवसेना शिंदे गट) ४०२१ मतांनी विजयी. महाविकास आघाडीचे उमेदवार शंकराव गडाख (शिवसेना ठाकरे) यांचा पराभव. बाळासाहेब मुरकुटे यांच्यानंतर लंघे ठरले जायंट किलर. 

विधानसभेच्या २८८ मतदारसंघाचं चित्र होणार स्पष्ट  अवघ्या देशाचं लक्ष लागून असलेल्या महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीसाठी आज मतमोजणी सुरू झाली आहे. राज्यात सत्ता बदल होणार की पुन्हा महायुतीचं सरकार येणार? हे आज स्पष्ट होईल. २८८ विधानसभा मतदारसंघासाठी २० नोव्हेंबरला मतदान पार पडलं. यावेळी २८८ मतदारसंघात ४ हजार १४० उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात उतरले आहेत. यावेळी राज्यात सर्वाधिक ६६ टक्के मतदान झालं आहे. त्यामुळे वाढलेलं मतदान कुणाच्या बाजूने असणार हे पाहण्याचं ठरणार आहे. 

टॅग्स :maharashtra assembly election 2024 resultमहाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2024maharashtra assembly election 2024महाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०२४Balasaheb Thoratबाळासाहेब थोरातRadhakrishna Vikhe Patilराधाकृष्ण विखे पाटील