शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'
2
महाराष्ट्रातले पोलीस अकार्यक्षम; शिंदेसेनेच्या आमदाराचा महायुती सरकारलाच घरचा आहेर
3
एकीकडे युद्धाचे सावट, त्यात पाकिस्तानमधील लाहोर विमानतळावर भीषण आग, उड्डाणं रद्द, प्रवासी अडकले
4
कधीही, कुठेही, मोहिमेसाठी तयार! भारतीय नौदलाचा पाकिस्तानला संदेश
5
अमेरिकेच्या बाजारात विकणार केवळ मेड इन इंडिया आयफोन; चीनला जोरदार झटका
6
“चिमुकल्यांना हृदयरोग, १ कोटी खर्च, भारतात उपचार घेऊ द्या”; पाकमधील पालकांचे सरकारला साकडे
7
"जर सिंधु नदीचं पाणी रोखलं तर...": पाकिस्तानी PM शहबाज शरीफ यांची भारताला पोकळ धमकी
8
Vastu Shastra: वास्तुशास्त्रानुसार तव्यावरच्या पहिल्या पोळीवर हक्क कुणाचा? वाचा आणि कृती करा!
9
जळगाव: घरात घुसला म्हणून वाचला! वाढदिवसाचं सेलिब्रेशन करतानाच आले अन् झाडल्या गोळ्या
10
भारत-पाकिस्तानमध्ये तणाव, डोनाल्ड ट्रम्प यांनी स्वतःला केलं दूर; म्हणाले, 'त्यांचं ते मिटवून घेतील'
11
'सिंधूतून आमचे पाणी वाहणार, नाहीतर भारताचे रक्त'; पाणी रोखताच पाकचे माजी मंत्री बिलावल भुत्तोंचा थटथयाट
12
पहलगाम हल्ल्यात हिंदूच टार्गेट! आधी पॅन्ट काढल्या अन् 'खतना' न केलेल्यांचीच हत्या; तपास पथकाकडून मोठा खुलासा
13
JioHotstar नं केली बक्कळ कमाई, बनला जगातील दुसरा सर्वात मोठा पेड युजर बेस
14
दोन मित्र आणि पहारेकऱ्याची हत्या, मग कापलं गुप्तांग, आरोपी अटकेत, समोर आलं धक्कादायक कारण
15
शनी गोचर २०२५: 'या' ५ राशींच्या आयुष्यात वादळाची शक्यता, आर्थिक बाजू सांभाळा!
16
सूरज चव्हाणच्या 'झापुक झुपूक' सिनेमाने पहिल्या दिवशी किती कमावले? बॉक्स ऑफिस कलेक्शन समोर
17
पाकिस्तानचे लज्जास्पद कृत्य! उच्चायुक्तालयाबाहेर निदर्शने, अधिकाऱ्याचा हातवारे करुन इशारा; पाहून तुम्हालाही राग येईल
18
आस्ताद काळेने सांगितली 'छावा'मधली मोठी चूक, म्हणाला- "छत्रपती संभाजी महाराजांचा राज्याभिषेक..."
19
ड्रीम कारसाठी दहा वर्षे वाट पाहिली, शोरूममधून बाहेर पडताच तासाभरात जळून खाक झाली
20
'पाकिस्तानचे दोन तुकडे करा, पाकव्याप्त काश्मीर भारतात घ्या', काँग्रेसच्या मुख्यमंत्र्याची PM मोदींकडे मागणी

VIDEO - सर्वोच्च राष्ट्रपती मानकाने ‘एसीसी अ‍ॅण्ड एस’चा गौरव

By admin | Updated: April 15, 2017 15:18 IST

ऑनलाइन लोकमत  अहमदनगर -  देशाचे राष्ट्रपती व तिन्ही सेनादलाचे प्रमुख प्रणव मुखर्जी यांच्या हस्ते येथील एसीसी अ‍ॅण्ड एस या ...

ऑनलाइन लोकमत अहमदनगर -  देशाचे राष्ट्रपती व तिन्ही सेनादलाचे प्रमुख प्रणव मुखर्जी यांच्या हस्ते येथील एसीसी अ‍ॅण्ड एस या लष्करी प्रशिक्षण संस्थेला सर्वोच्च राष्ट्रपती मानकाने गौरवण्यात आले. शनिवारी झालेल्या एका शानदार सोहळ्यात लष्कराचे उत्कृष्ट संचलन, रणगाड्यांचा ताफा अन् हेलिकॉप्टर, सुखोई हवाई विमानाच्या चित्तथरारक कसरतीने उपस्थित भारावले. 

येथील आर्मर्ड कार्प सेंटर अ‍ॅण्ड स्कूल या देशातील उत्कृष्ट लष्करी प्रशिक्षण संस्थेला शनिवारी सकाळी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांच्या हस्ते राष्ट्रपती मानक देऊन गौरविण्यात आले. एसीसी अ‍ॅण्ड एसचे कमांडिंग आॅफिसर मेजर जनरल प्रवीण दिक्षित यांनी हा मानाचा ध्वज स्वीकारला. प्रथम सैनिकांनी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी, लष्करप्रमुख जनरल बिपीन रावत, लेफ्टनंट जनरल पी. एम. हैरिज, लेफ्ट. जनरल डी. आर. सोनी आदी प्रमुख पाहुण्यांना सलामी दिली. राष्ट्रपतींचे मानक मिळणे हे कोणत्याही सैनिक तुकडीचा सर्वोच्च सन्मान व दुर्मिळ क्षण असतो. सैनिकांचे मनोधैर्य वाढवण्याचे काम हे निशान करते. अहमदनगरमध्ये १९४८मध्ये एसीसी अ‍ॅण्ड एसची स्थापना झाली. तेव्हापासून आतापर्यंतच्या ६९ वर्षांच्या कामगिरीच्या आधारे त्यांना हा सर्वोच्च बहुमान पहिल्यांदाच मिळाला आहे. 

तत्पूर्वी जवानांनी शिस्तबद्ध संचलन केले. या संचलनात घोडेस्वार, लढाऊ रणगाडे, तसेच जवानांनी विविध कसरती दाखवत सैन्य सज्जतेची झलक दाखवली. याच दरम्यान, लढाऊ सुखोई विमान, तसेच हेलिकॉप्टरने आकाशातून ध्वजवहन करून आपले सामर्थ्य प्रदर्शित केले. राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांच्या हस्ते ‘फर्स्ट डे कव्हर’चे प्रकाशन झाले. एसीसी अ‍ॅण्ड एसच्या उत्कृष्ट कामगिरीचे त्यांनी आपल्या भाषणात कौतूक केले.