वर्धापनदिनी भाकपचा विजयी जल्लोष

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 28, 2020 04:11 IST2020-12-28T04:11:46+5:302020-12-28T04:11:46+5:30

यावेळी भाकपचे जिल्हा सहसचिव अ‍ॅड. कॉ. सुधीर टोकेकर, मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे प्रा. डॉ. महेबूब सय्यद, लाल बावटा विडी कामगार ...

Victory celebration of CPI (M) on its anniversary | वर्धापनदिनी भाकपचा विजयी जल्लोष

वर्धापनदिनी भाकपचा विजयी जल्लोष

यावेळी भाकपचे जिल्हा सहसचिव अ‍ॅड. कॉ. सुधीर टोकेकर, मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे प्रा. डॉ. महेबूब सय्यद, लाल बावटा विडी कामगार संघटनेच्या भारती न्यालपेल्ली, क्रांतिसिंह कामगार संघटनेचे रामदास वागस्कर, अंबादास दौंड, भैरवनाथ वाकळे, अ. भा. किसान सभेचे विजय केदारे, दत्ताभाऊ वडवणीकर, बाळासाहेब सागडे, संतोष गायकवाड, सतीश पवार, अरुण थिटे, कार्तिक पासलकर, चंद्रकांत माळी, सुनील ठाकरे, अनिल माळी, आसाराम भगत, प्रशांत चांदगुडे आदी उपस्थित होते.

दरम्यान, केरळ येथील तिरुवनंतपुरम महानगरपालिकेमध्ये देशातील सर्वात कमी वयाची युवती महापौर म्हणून मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाच्या कॉम्रेड आर्या राजेंद्रन यांची नुकतीच निवड करण्यात आली. कोणताही राजकीय वारसा नसलेल्या सर्वसामान्य कुटुंबातून त्या पुढे आल्या आहेत. या विजयाचा जल्लोष भाकपच्या वर्धापनदिनी करण्यात आला.

-----------

फोटो - २६भाकप जल्लोष भारतीय कम्युनिस्ट पक्षाचा ९५ वा वर्धापन दिन व कॉ. आर्या राजेंद्रन ही देशातील सर्वात कमी वयाची युवती महापौर झाल्याबद्दल बुरुडगाव रोड येथील भाकपच्या पक्ष कार्यालयासमोर फटाके वाजवून जल्लोष करण्यात आला.

Web Title: Victory celebration of CPI (M) on its anniversary