महात्मा फुले कृषी विद्यापीठाच्या कुलगुरूपदी डॉ. प्रशांतकुमार पाटील

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 28, 2021 04:40 IST2021-02-28T04:40:17+5:302021-02-28T04:40:17+5:30

राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी शनिवारी (दि. २७) पाटील यांची पाच वर्षांच्या कार्यकाळासाठी नियुक्ती जाहीर केली. विद्यापीठाचे कुलगुरू के. ...

As the Vice Chancellor of Mahatma Phule Agricultural University, Dr. Prashant Kumar Patil | महात्मा फुले कृषी विद्यापीठाच्या कुलगुरूपदी डॉ. प्रशांतकुमार पाटील

महात्मा फुले कृषी विद्यापीठाच्या कुलगुरूपदी डॉ. प्रशांतकुमार पाटील

राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी शनिवारी (दि. २७) पाटील यांची पाच वर्षांच्या कार्यकाळासाठी नियुक्ती जाहीर केली.

विद्यापीठाचे कुलगुरू के. पी. विश्वनाथा यांचा कार्यकाळ ४ नोव्हेंबर २०२० पूर्ण झाल्यामुळे हे पद रिक्त झाले होते. वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. अशोक ढवण यांच्याकडे पदाचा अतिरिक्त कार्यभार देण्यात आला होता. पाटील यांनी महात्मा फुले कृषी विद्यापीठातून कृषी अभियांत्रिकी या विषयात बी.टेक पदवी प्राप्त केल्यानंतर त्यांनी आयआयटी खडकपूर येथून एम.टेक व त्यानंतर नागपूर येथील व्हीएनआयटी येथून पीएच.डी. प्राप्त केली आहे.

कुलगुरू नियुक्तीसाठी डॉ. लक्ष्मण सिंह राठोड, माजी महासंचालक भारतीय हवामानशास्त्र विभागाचे यांच्या अध्यक्षतेखाली कुलगुरू निवड समिती गठित केली होती. भारतीय कृषी संशोधन संस्थेचे संचालक डॉ. ए. के. सिंह, कृषि विभागाचे सचिव एकनाथ डवळे हे समितीचे सदस्य होते.

Web Title: As the Vice Chancellor of Mahatma Phule Agricultural University, Dr. Prashant Kumar Patil

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.