भाजीपाल्याची रोपवाटिका

By Admin | Updated: April 27, 2017 18:49 IST2017-04-27T18:49:59+5:302017-04-27T18:49:59+5:30

देवळाली प्रवरा येथील सुरेश कडू यांनी पारंपरिक शेतीऐवजी वेगळी वाट धरत थेट रोपे तयार करण्याचा निर्णय घेतला.

Vegetable nursery | भाजीपाल्याची रोपवाटिका

भाजीपाल्याची रोपवाटिका

ऊसाहेब येवले/राहुरी, दि. २७- देवळाली प्रवरा येथील सुरेश कडू यांनी पारंपरिक शेतीऐवजी वेगळी वाट धरत थेट रोपे तयार करण्याचा निर्णय घेतला. अल्पावधीतच परिसरातील शेतकºयांकडून रोपांसाठी त्यांच्याकडे मागणी वाढू लागली. सध्या भाजीपाला पिकासह अनेक फळ, फुलांची रोपे त्यांच्याकडे उपलब्ध आहेत. त्यातून त्यांच्या कुटुबियांबरोबर आणखी चारजणांना रोजगार मिळाला आहे.चांगली नोकरी सोडून त्यांनी गावातील शेती फुलविण्याचा निर्णय घेतला़ लहानपणापासून पर्यावरणाची आवड असल्याने रोपे तयार करण्याचे ठरवले. देवळाली प्रवरा येथील वडिलोपार्जित शेतीमध्ये रोपवाटिका सुरू केली़ सर्व कुटुंब रोपवाटिकेत रमले़ याशिवाय अन्य चार जणांना रोजगार उपलब्ध करून देताना शेतकºयांना दर्जेदार रोपे उपलब्ध करून दिली़ कडू यांच्या रोपवाटिकेचे वैशिष्ट्य म्हणजे प्रत्येक जातीचे रोप टॅग केले जाते़ रोपे तयार केल्यानंतर वहित जात, तारीख, खते, पाणी यांची नोंद केली जाते़ कोणते रोप किती प्रमाणावर उगले याची नोंद ते ठेवतात. त्यामुळे शेतकºयांची फसवणूक होत नाही़ शेतक-यांनी कोणते पीक घेतले म्हणजे फायदेशीर ठरेल याचा अभ्यास केला जातो़ यादृष्टीकोनातून कडू हे मार्केटमध्ये जाऊन भाजीपाला व फळांच्या दराचा अभ्यासही करतात़

Web Title: Vegetable nursery

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.