भाजीपाला, किराणा, कृषी सेवा केंद्र आजपासून सुरू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 15, 2021 04:19 IST2021-05-15T04:19:17+5:302021-05-15T04:19:17+5:30
अहमदनगर : महापालिकेने लागू केलेले कठोर निर्बंध शिथिल केले असून, शनिवारपासून शहरातील भाजीपाला विक्री, किराणा दुकाने सकाळी ७ ते ...

भाजीपाला, किराणा, कृषी सेवा केंद्र आजपासून सुरू
अहमदनगर : महापालिकेने लागू केलेले कठोर निर्बंध शिथिल केले असून, शनिवारपासून शहरातील भाजीपाला विक्री, किराणा दुकाने सकाळी ७ ते ११ वाजेपर्यंत सुरू ठेवण्यास मुभा दिली आहे. याशिवाय कृषी सेवा केंद्रांची वाहतूक करण्यास सकाळी ८ ते सायंकाळी ४ वाजेपर्यंत सुरू राहणार आहेत.
नगर शहरातील कोरोना साखळी तोडण्यासाठी महापालिकेने कठोर निर्बंध लगू केले होते. त्याची मुदत शनिवारी सकाळी ७ वाजता संपणार असल्याने महापालिका आयुक्त शंकर गोरे यांनी शुक्रवारी नव्याने आदेश जारी केला. यामध्ये काही प्रमाणात निर्बंध शिथिल करण्यात आले आहेत. हे निर्बंध येत्या २५ मेपर्यंत लागू राहणार असून, खाजगी आस्थापना वगळता इतर अत्यावश्यक सेवा सकाळी ७ ते ११ या वेळेत सुरू ठेवण्यास परवानगी देण्यात आली आहे. नगर शहरातील भाजीपाला, किराणा विक्रीस पूर्णपणे बंदी हाेती. पंधरा दिवसांनंतर भाजीपाला व किराणा दुकाने शनिवारपासून सुरू होत आहेत. त्यामुळे नागरिकांना मोठा दिलासा मिळाला आहे.
....
हे राहणार सुरू
वैद्यकीय सेवा
अत्यावश्यक सेवसोठी पेट्रोलपंप नियमित वेळेत सुरू राहतील
- सर्व बँका सुरू राहतील.
- दूध व दुग्धजन्य पदार्थांची विक्री सकाळी ७ ते ११ यावेळेत सुरू राहतील.
-पशुखाद्य विक्री सकाळी ७ ते ११ यावेळेत सुरू राहील.
-कृषी सेवा केंद्र सकाळी ९ ते सायंकाळी ४ वाजेपर्यंत सुरू राहतील.
- भाजीपाला फळे खरेदी- विक्री सकाळी ७ ते ११ यावेळेत सुरू राहील.
- किराणा दुकाने सकाळी ७ ते ११ यावेळेत सुरू राहतील.
- अंडी, मटण, चिकनची दुकाने सकाळी ७ ते ११ यावेळेत सुरू राहतील.
...
खाजगी आस्थापना पूर्णपणे बंद राहणार
शहरातील खाजगी आस्थापना पूर्णवेळ बंद ठेवण्याचा आदेश महापालिकेने जारी केला असून, इतर दुकाने बंद राहणार असल्याचे सांगण्यात आले.
....
नियम न पाळल्यास असा होणार दंड
- कृषी सेवा केंद्रांसाठी ५ हजारांचा दंड
- किराणा दुकानदारांसाठी १० हजारांचा दंड
-भाजीपाला विक्री करणाऱ्यांना १ हजारांचा दंड
-अंडी, मटण, चिकन दुकानदारांना ५ हजारांचा दंड