भानगावात वटपौर्णिमा उत्साहात साजरी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 26, 2021 04:16 IST2021-06-26T04:16:16+5:302021-06-26T04:16:16+5:30

श्रीगोंदा : भानगाव (ता.श्रीगोंदा) येथे वटपौर्णिमा उत्साहात साजरी करण्यात आली. ग्रामपंचायत सदस्या अलका दिलीपराव कुदांडे यांनी वड, आंबा, फळझाडांची ...

Vatpoornima celebrations in Bhangaon | भानगावात वटपौर्णिमा उत्साहात साजरी

भानगावात वटपौर्णिमा उत्साहात साजरी

श्रीगोंदा : भानगाव (ता.श्रीगोंदा) येथे वटपौर्णिमा उत्साहात साजरी करण्यात आली. ग्रामपंचायत सदस्या अलका दिलीपराव कुदांडे यांनी वड, आंबा, फळझाडांची महिलांना भेट दिली.

भानगाव परिसरात जिल्हा परिषद सदस्या अनुराधा नागवडे, माजी जिल्हा परिषद सदस्या प्रतिभा पाचपुते यांच्या हस्ते वृक्षारोपण केले. अनुराधा नागवडे म्हणाल्या, अलका कुंदाडे यांनी महिलांना वृक्ष भेट देण्याचा आदर्श उपक्रम राबविला आहे.

प्रतिभा पाचपुते म्हणाल्या, वृक्षारोपण व संवर्धन करण्याचे उपक्रम राबविले तर कृत्रिम ऑक्सिजनची आवश्यकता पडणार नाही.

शरद कुंदाडे म्हणाले, दर वटपौर्णिमेला वृक्षभेटीचा उपक्रम राबविणार आहे.

यावेळी धोंडिबा पानसरे, आशा गोरे, सरपंच जयश्री नवले, आबासाहेब शितोळे, नवनाथ पांडुळे, जिजाबाई साबळे, आदिका टकले, दीपाली कुदांडे, दीपाली शितोळे, सुमन तोरडमल, मुख्याध्यापक विश्वनाथ शेलार, समीर शितोळे, मधुकर साबळे उपस्थित होते.

सूत्रसंचालन केशव मोढवे यांनी केले. शरद कुदांडे यांनी आभार मानले.

---

२५ भानगाव

भानगाव येथे मान्यवरांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले.

Web Title: Vatpoornima celebrations in Bhangaon

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.