कोहीनूरचे संचालक वसंतलाल गांधी यांचे निधन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 17, 2018 12:15 IST2018-05-17T12:04:19+5:302018-05-17T12:15:12+5:30
येथील कोहीनूर या प्रसिद्ध वस्त्रदालनाचे संचालक वसंतलाल कनकमलजी गांधी (वय ८५) यांचे गुरुवारी (दि.१७) पहाटे साडेचार वाजता वृद्धापकाळाने निधन झाले.

कोहीनूरचे संचालक वसंतलाल गांधी यांचे निधन
अहमदनगर : येथील कोहीनूर या प्रसिद्ध वस्त्रदालनाचे संचालक वसंतलाल कनकमलजी गांधी (वय ८५) यांचे गुरुवारी (दि.१७) पहाटे साडेचार वाजता वृद्धापकाळाने निधन झाले. त्यांच्या पश्चात मुलगा प्रदीप, मुलगी जयश्री मोहनलाल मुनोत, नातू अश्विन, नात मधूर जैन, सूना, नातवंडे असा मोठा परिवार आहे.
स्व. गांधी यांनी मरणोत्तर नेत्रदान केले. त्यांच्यावर गुरुवारी दुपारी अमरधाम स्मशानभूमित अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी विविध क्षेत्रातील मान्यवर, व्यापारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कनकमल गांधी यांनी १९३७ मध्ये कापड बाजारात एक छोटे कापडाचे दुकान सुरू केले. त्याच कापडदुकानाचे मोठे दुकान करून वसंतलालजी यांनी कोहीनूर वस्त्रदालनाची मुहुर्तमेढ रोवली. १९६२ मध्ये कोहीनूर हे दुकान राज्यभरात नावारुपास आणण्यासाठी वसंतलालजी यांनी मोठी मेहनत घेतली. याच वर्षात रामनवनमीच्या मुहुर्तावर कोहीनूर फॅशन हाऊस या नावाने दुकानाचे नूतनीकरण करीत दुकानाला अत्याधुनिक स्वरुप दिले. बदलत्या काळात ग्राहकांना सेवा देणे, त्यांचा विश्वास जपणे आणि दर्जा सांभाळणे हे तत्त्व वसंतलालजी यांनी सांभाळून ठेवले. त्यांचा आदर्श वारसा त्यांचे पुत्र प्रदीप गांधी आणि नातू अश्विन गांधी पुढे नेत आहेत.