वरुण राजा बरसताच पेरणीच्या कामाला वेग

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 9, 2021 04:26 IST2021-06-09T04:26:36+5:302021-06-09T04:26:36+5:30

भंडारदरा हा परिसर सह्याद्रीच्या पर्वतरांगांनी वेढलेला आहे. या परिसरात भात हे प्रमुख पीक असून या बरोबर नाचणी, वरई (वरी), ...

Varun Raja speeds up the sowing work as soon as it rains | वरुण राजा बरसताच पेरणीच्या कामाला वेग

वरुण राजा बरसताच पेरणीच्या कामाला वेग

भंडारदरा हा परिसर सह्याद्रीच्या पर्वतरांगांनी वेढलेला आहे. या परिसरात भात हे प्रमुख पीक असून या बरोबर नाचणी, वरई (वरी), खुरसणी, हे पिके घेतली जातात. रोज पडणाऱ्या पावसामुळे भात पेरणीसाठी योग्य वातावरण (वापसा) असल्याने शेतकरी पेरणीच्या कामात मग्न झाला आहे. तर घाटघर परिसरात ९० टक्के पेरणीची कामे पूर्ण झाली आहेत. शेतकरी शेतीची मशागत करताना दिसत आहेत.

हवामान खात्याच्या अंदाजानुसार ह्या वर्षी मोसमी पाऊस लवकर महाराष्ट्रात दाखल झाला आहे. मागील काही दिसांपासून संध्याकाळच्या वेळी पावसाच्या हलक्या सरी पडत आहे. यामुळे शेतीच्या कामांना वेग आला आहे. बी-बियाणे व खते खरेदीसाठी कृषी दुकानांतून गर्दी दिसत आहे. लवकर पडणाऱ्या पावसामुळे पेरणीच्या कामांना लवकर सुरवात झाली आहे. यामुळे शेतकरी वर्गात आनंदाचे वातावरण आहे. वरुण राजा हलक्या स्वरूपाने बरसत असल्याने हवेत गारवा तयार झाला असून बळीराजा सुखावला आहे.

( ०८ भात पेरणी,१,२

Web Title: Varun Raja speeds up the sowing work as soon as it rains

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.