शरद पवार यांच्या वाढदिवसानिमित्त विविध कार्यक्रम
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 12, 2020 04:37 IST2020-12-12T04:37:34+5:302020-12-12T04:37:34+5:30
जामखेड : राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या ८० व्या वाढदिवसानिमित्त जामखेड शहर व तालुक्यात विविध कार्यक्रमांचे आयोजन केल्याची ...

शरद पवार यांच्या वाढदिवसानिमित्त विविध कार्यक्रम
जामखेड : राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या ८० व्या वाढदिवसानिमित्त जामखेड शहर व तालुक्यात विविध कार्यक्रमांचे आयोजन केल्याची माहिती राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश सरचिटणीस राजेंद्र कोठारी यांनी दिली. कोठारी म्हणाले, जामखेड शहरातील महावीर मंगल कार्यालयात सकाळी साडेनऊ ते पाच वाजेपर्यंत तसेच प्रभाग अकरामध्ये प्रशांत राळेभात व प्रभाग आठमध्ये सय्यद इस्माईल या कार्यकर्त्यांनी रक्तदान शिबिराचे आयोजन केले आहे. खर्डा येथे राष्ट्रवादी काँग्रेसचे विजयसिंह गोलेकर यांनी मॅरेथॉन स्पर्धा आयोजित केली आहे. प्रदेश राष्ट्रवादी काँग्रेसने मुंबई येथे व्हर्च्युअल रॅलीचे मुंबईवरून थेट प्रक्षेपण सकाळी साडेदहा वाजता होणार आहे. ते तालुक्यातील पदाधिकारी व कार्यकर्ते यांना ऑनलाइन पाहता यावी यासाठी येथील राज लॉन्समध्ये व्यवस्था केली आहे, असे कोठारी यांनी सांगितले.