मनोहरनाथ बाबांच्या पुण्यतिथीनिमित्त विविध कार्यक्रम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 23, 2021 04:30 IST2021-02-23T04:30:43+5:302021-02-23T04:30:43+5:30

नेवासा : संत-महंतांच्या उपस्थितीत येथील मध्यमेश्वर मंदिराचे महंत मनोहरनाथ बाबांची पुण्यतिथी विविध कार्यक्रमांनी साजरी करण्यात आली. यावेळी मृद व ...

Various programs on the occasion of Manoharnath Baba's death anniversary | मनोहरनाथ बाबांच्या पुण्यतिथीनिमित्त विविध कार्यक्रम

मनोहरनाथ बाबांच्या पुण्यतिथीनिमित्त विविध कार्यक्रम

नेवासा : संत-महंतांच्या उपस्थितीत येथील मध्यमेश्वर मंदिराचे महंत मनोहरनाथ बाबांची पुण्यतिथी विविध कार्यक्रमांनी साजरी करण्यात आली. यावेळी मृद व जलसंधारणमंत्री शंकरराव गडाख यांची उपस्थिती होती. मंदिरातील मनोहरनाथ बाबांच्या मूर्तीस योगी सेवकनाथ महाराज, योगी धर्मानंद महाराज, बालयोगी दीपकनाथ महाराज यांच्या हस्ते वेदमंत्राच्या जयघोषात अभिषेक घालण्यात आला. यावेळी मंदिर प्रांगणात योगी मनोहर बाबा चरित्रग्रंथाचे वाचन रामनाथ महाराज पवार व विजय महाराज पवार यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आले. यावेळी संत ज्ञानेश्वर महाराज मंदिर देवस्थानचे प्रमुख शिवाजी महाराज देशमुख यांचे योगी मनोहरनाथ बाबांच्या जीवनचरित्रावर प्रवचन झाले. संयोजक योगी महंत ऋषिकेशनाथ महाराज यांनी संत महंतांचे स्वागत केले.

यावेळी शंकरराव गडाख यांचा संत महंतांच्या हस्ते गौरव करण्यात आला. यावेळी शिवाजी महाराज देशमुख, सुनीलगिरी महाराज, गहिनीनाथ महाराज आढाव, योगी त्रिंबक आनंद सरस्वती आदी उपस्थित होते.

Web Title: Various programs on the occasion of Manoharnath Baba's death anniversary