दहिगावनेच्या नवजीवन विद्यालयात विविध स्पर्धा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 17, 2021 04:27 IST2021-09-17T04:27:04+5:302021-09-17T04:27:04+5:30

दहिगावने : शेवगाव तालुक्यातील दहिगावने येथील जनता शिक्षण प्रसारक मंडळाचे संस्थापक शिक्षण महर्षी स्वर्गीय लोकनेते मारुतरावजी घुले पाटील यांच्या ...

Various competitions at Navjivan Vidyalaya, Dahigaon | दहिगावनेच्या नवजीवन विद्यालयात विविध स्पर्धा

दहिगावनेच्या नवजीवन विद्यालयात विविध स्पर्धा

दहिगावने : शेवगाव तालुक्यातील दहिगावने येथील जनता शिक्षण प्रसारक मंडळाचे संस्थापक शिक्षण महर्षी स्वर्गीय लोकनेते मारुतरावजी घुले पाटील यांच्या ९१ व्या जयंतीनिमित्त नवजीवन विद्यालय दहिगावने येथे वक्तृत्व स्पर्धा, हस्ताक्षर स्पर्धा, रंगभरण स्पर्धा, रांगोळी स्पर्धा अशा विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात आले होते.

बक्षीस वितरण कार्यक्रमप्रसंगी उपस्थित मान्यवरांच्या हस्ते लोकनेते मारुतराव घुले पाटील यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. विविध स्पर्धेत प्रथम, द्वितीय व तृतीय क्रमांक पटकाविलेल्या विद्यार्थ्यांना मान्यवरांच्या हस्ते पारितोषिक वितरण करण्यात आले. विद्यालयाच्या परिसरात वृक्षारोपण करण्यात आले. यावेळी मंडळ कृषी अधिकारी कानिफनाथ मरकड, प्रशासकीय अधिकारी के. वाय. नजन, जहांगीर, सरपंच सुभाष पवार, प्राचार्य डॉ. शरद कोलते, अशोक उमलमुगले, उपप्राचार्या उषा धुमाळ, ग्रामविकास अधिकारी रामकिसन बटुळे, डॉ. नीलेश खरात, आदी उपस्थित होते. कार्यक्रमाच्या ऑनलाइन प्रक्षेपणाची जबाबदारी गणेश पवार यांनी पार पाडली. प्रा. बाळासाहेब मंडलिक यांनी आभार मानले.

Web Title: Various competitions at Navjivan Vidyalaya, Dahigaon

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.