चित्रकला स्पर्धेत वैष्णवी माने प्रथम
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 31, 2021 04:21 IST2021-07-31T04:21:49+5:302021-07-31T04:21:49+5:30
कर्जत : वन्यजीव विभाग पुणे अंतर्गत रेहकुरी वनपरिक्षेत्र कार्यालयातर्फे आंतरराष्ट्रीय व्याघ्र दिनानिमित्त ऑनलाईन आयोजित चित्रकला स्पर्धा २०२१ या तीन ...

चित्रकला स्पर्धेत वैष्णवी माने प्रथम
कर्जत : वन्यजीव विभाग पुणे अंतर्गत रेहकुरी वनपरिक्षेत्र कार्यालयातर्फे आंतरराष्ट्रीय व्याघ्र दिनानिमित्त ऑनलाईन आयोजित चित्रकला स्पर्धा २०२१ या तीन गटातून घेण्यात आलेल्या स्पर्धेला उत्तम प्रतिसाद मिळाला. यामध्ये कर्जत येथील वैष्णवी माने हिने प्रथम क्रमांक पटकाविला.
स्पर्धेतील विजेत्यांना पारितोषिकाचे वितरण रेहकुरी वनपरिक्षेत्र कार्यालय कर्जत येथे करण्यात आले. स्पर्धेसाठी पुणे, सातारा, कोल्हापूर येथून नामांकन प्राप्त झाली होती. त्यामध्ये वैष्णवी सुरेश माने हिने आठवी ते दहावी गटातून प्रथम क्रमांक मिळविला. वैष्णवी ही डायनामिक इंग्लिश स्कूल कर्जतची विद्यार्थिनी असून ती सहायक पोलीस निरीक्षक सुरेश माने यांची मुलगी आहे. वैष्णवी मानेचा प्रमाणपत्र देऊन क्षेत्रीय वनाधिकारी रेहकुरी सागर केदार यांनी कौतुक केले आहे.
---
३० वैष्णवी माने