वडुले बुद्रुक-जोहरापूर रस्ता दुरुस्त करावा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 19, 2021 04:21 IST2021-09-19T04:21:37+5:302021-09-19T04:21:37+5:30
शेवगाव : तालुक्यातील वडुले बुद्रुक-जोहरापूर रस्ता तातडीने दुरुस्त करावा, अशा मागणीचे निवेदन जिल्हा परिषद सदस्या यांनी शेवगावच्या नायब तहसीलदारांना ...

वडुले बुद्रुक-जोहरापूर रस्ता दुरुस्त करावा
शेवगाव : तालुक्यातील वडुले बुद्रुक-जोहरापूर रस्ता तातडीने दुरुस्त करावा, अशा मागणीचे निवेदन जिल्हा परिषद सदस्या यांनी शेवगावच्या नायब तहसीलदारांना दिले.
यावेळी वडुले येथील माधव गोलांडे, प्रदीप दानवे, सुभाष गोलांडे, भाऊसाहेब डमाळ, किसन हरवणे, साहेबराव हरदास, विष्णू बिचकुल, विठ्ठल हरवणे, सुभाष हरवणे, धनंजय पांडव, महादेव हरवणे आदी उपस्थित होते.
वडुले बुद्रुक ते जोहरापूर रस्त्याच्या बाजूने गावातील बहुसंख्य शेतकरी राहतात. काही शेतकऱ्यांच्या या रस्त्याच्या बाजूने जमिनी आहेत. वडुले बुद्रुकच्या पूर्व बाजूला नंदिनी नदी आहे. ३१ ऑगस्ट रोजी तालुक्यात प्रचंड पाऊस होऊन या नदीला महापूर आला. या पुरामध्ये वडुले बुद्रुक ते जोहरापूर हा रस्ता वाहून गेला, तर काही ठिकाणी खचला आहे. रस्ता खचल्याने लोकांची शेतात अथवा गावात जाण्या-येण्याची गैरसोय होत आहे. पूरग्रस्तांसाठीच्या निधीतून या रस्त्यावर तात्पुरत्या स्वरूपात मुरूम टाकावा, असेही निवेदनात म्हटले आहे.
निवेदनावर नानासाहेब बुचकुल, बाळासाहेब हरवणे, दीपक कबाडी, संजय पांडव, दत्तात्रय कबाडी, गोरक्षनाथ यादव, शंकर हरवणे, शेख समसोद्दिन, रोहिदास हरवणे, काकासाहेब जाधव, पांडुरंग गायकवाड, बाळासाहेब पांडव, पांडुरंग पांडव आदींच्या सह्या आहेत.