आज उपलब्ध होणार लस

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 5, 2021 04:35 IST2021-05-05T04:35:25+5:302021-05-05T04:35:25+5:30

गेल्या आठवड्यापासून लस नसल्याने नगर जिल्ह्यातील ४५ वर्षांपुढील लसीकरण ठप्प झाले आहे. २८ एप्रिल रोजी १९ हजार डोस प्राप्त ...

The vaccine will be available today | आज उपलब्ध होणार लस

आज उपलब्ध होणार लस

गेल्या आठवड्यापासून लस नसल्याने नगर जिल्ह्यातील ४५ वर्षांपुढील लसीकरण ठप्प झाले आहे. २८ एप्रिल रोजी १९ हजार डोस प्राप्त झाले होते. ते २९ व ३० एप्रिल रोजी संपले. त्यामुळे जिल्हाभरातील लसीकरण केंद्रे गेल्या चार-पाच दिवसांपासून बंद आहेत. नवीन लस कधी येणार याबाबतची विचारणा प्रत्येक केंद्रांवर नागरिक दररोज करीत आहेत.

दरम्यान, मंगळवारी (दि. ४) संध्याकाळी पुणे येथील सिरम इन्स्टिट्यूटमधून लस घेऊन जाण्याबाबत जिल्हा परिषदेला निरोप आला. त्यानुसार आरोग्य विभागाने लस आणण्यासाठी गाडी पाठविली असून २५ ते ३० हजार लसींचा डोस मंगळवारी रात्री उपलब्ध होईल, अशी माहिती आरोग्य विभागाकडून देण्यात आली. बुधवारी सकाळी या लसीचे जिल्हाभरातील लसीकरण केंद्रांसाठी वाटप होईल. त्यानंतर काही केंद्रांवर बुधवारी तर उर्वरित केंद्रांवर गुरुवारी लसीकरण सुरू होण्याची शक्यता आहे.

दुसरीकडे १८ ते ४४ वर्षांपर्यंतच्या नागरिकांसाठी केवळ महानगरपालिकेला १० हजार लसीचे डोस १ मे रोजी प्राप्त झालेले आहेत. त्यातून महानगरपालिका हद्दीतील पाच केंद्रांवर लसीकरण सुरू आहे. दररोज सुमारे दीड हजार या प्रमाणे आतापर्यंत साधारण ५ हजार डोस संपले आहेत. आणखी पाच हजार महापालिकेकडे शिल्लक आहेत.

Web Title: The vaccine will be available today