नगरसेवक चव्हाण दाम्पत्याचे लसीकरण नोंदणी अभियान
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 24, 2021 04:15 IST2021-06-24T04:15:33+5:302021-06-24T04:15:33+5:30
अभियानप्रसंगी नगराध्यक्षा अनुराधा आदिक, कामगार रुग्णालयाचे डॉ. रवींद्र जगधने, अतिरिक्त जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. वसंत जमधडे, डॉ. निशिकांत चव्हाण, ...

नगरसेवक चव्हाण दाम्पत्याचे लसीकरण नोंदणी अभियान
अभियानप्रसंगी नगराध्यक्षा अनुराधा आदिक, कामगार रुग्णालयाचे डॉ. रवींद्र जगधने, अतिरिक्त जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. वसंत जमधडे, डॉ. निशिकांत चव्हाण, डॉ. दिलीप शिरसाठ, ग्रामीण रुग्णालय वैद्यकीय अधिकारी डॉ. योगेश बंड उपस्थित होते.
लसीकरणाबाबत लोकांमध्ये वेगवेगळ्या शंका आहेत. त्या दूर करण्यासाठी शहरामध्ये ऑडिओ माध्यमातून अभियान सुरू केले. कोरोना जनजागृती रथ प्रभागात फिरविला. प्रश्नोत्तरे व लसीकरण यावर छोटा माहितीपट दाखविला. १५ दिवसांत शहरात सर्व प्रभागांत ही जनजागृती करण्यात आली. त्याद्वारे लसीकरण नोंदणी करून घेण्याचा प्रयत्न आहे, असे दीपक चव्हाण म्हणाले.
कार्यक्रमास प्रभागातील शिवसर्कल मित्रमंडळ, जयसेवा ग्रुप, खालसा ग्रुप, जय बजरंग, जय वडार ग्रुप, ओन्ली बजरंग ग्रुप, साईश्रद्धा मित्रमंडळ, अक्षय कॉर्नर, सह्याद्री, सहारा, श्रीराम मंडळ,जगदंबा प्रतिष्ठान, पावन गणपती मित्रमंडळ, श्रीराम मित्रमंडळ यांचे सहकार्य मिळाले.
---------