दिवसभरात उच्चांकी ६२ हजार डोसचे लसीकरण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 5, 2021 04:26 IST2021-09-05T04:26:20+5:302021-09-05T04:26:20+5:30

अहमदनगर : कोरोना लसीकरणाची मोहीम जिल्ह्यात आता गती घेत असून, शनिवारी दिवसभरात ६२ हजार डोसचे लसीकरण करण्यात आले. आतापर्यंतचा ...

Vaccination of a maximum of 62,000 doses per day | दिवसभरात उच्चांकी ६२ हजार डोसचे लसीकरण

दिवसभरात उच्चांकी ६२ हजार डोसचे लसीकरण

अहमदनगर : कोरोना लसीकरणाची मोहीम जिल्ह्यात आता गती घेत असून, शनिवारी दिवसभरात ६२ हजार डोसचे लसीकरण करण्यात आले. आतापर्यंतचा हा नगर जिल्ह्यातील उच्चांक आहे.

नगर जिल्ह्यात १६ जानेवारीपासून कोरोना लसीकरणाची मोहीम सुरू झाली. प्रारंभी लस कमी येत असल्याने मोहिमेला मर्यादा होत्या; मात्र आता गेल्या महिन्याभरापासून लसीकरण मोहिमेने गती घेतली आहे. जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भोसले, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी राजेंद्र क्षीरसागर, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. संदीप सांगळे यांच्या मार्गदर्शनाखाली लसीकरणाचे यशस्वी नियोजन सुरू आहे.

शनिवारी नगर जिल्ह्यातील प्राथमिक आरोग्य केंद्र, महानगरपालिकेची केंद्र तसेच जिल्हा रुग्णालय आदी ठिकाणी तब्बल २९८ केंद्रांवर लसीकरण करण्यात आले. दिवसभरात ६२ हजार लसीचे डोस देण्यात आले. रात्री उशिरापर्यंत हे लसीकरण सुरू होते.

गेल्या काही दिवसांपासून मुबलक प्रमाणात लसीचा पुरवठा होत आहे. प्राथमिक आरोग्य केंद्र, तसेच गावोगावीही लसीकरणाची शिबिरे होत असल्याने मोठ्या प्रमाणात लस देण्यात येत आहे.

आतापर्यंत जिल्ह्यात १८ लाख ७० हजार डोस लसीकरण झाले आहे. त्यात साडेतेरा लाख जणांना पहिला डोस, तर पाच लाख २० हजार जणांना दुसरा डोस देण्यात आला आहे.

Web Title: Vaccination of a maximum of 62,000 doses per day

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.