लसीकरणाने ओलांडला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 14, 2021 04:19 IST2021-04-14T04:19:23+5:302021-04-14T04:19:23+5:30
अहमदनगर : गेले तीन महिने नगर जिल्ह्यात लसीकरण मोहीम सुरू असून तीन लाखांहून अधिक डोस आतापर्यंत दिले गेले आहेत. ...

लसीकरणाने ओलांडला
अहमदनगर : गेले तीन महिने नगर जिल्ह्यात लसीकरण मोहीम सुरू असून तीन लाखांहून अधिक डोस आतापर्यंत दिले गेले आहेत. यात सर्वाधिक अडीच लाख डोस ४५ वर्षांवरील नागरिकांना, तर ४१ हजार डोस आरोग्य कर्मचाऱ्यांना देण्यात आले आहेत.
नगर जिल्ह्यासह राज्यभरामध्ये १६ जानेवारीला कोरोना प्रतिबंधक लसीकरण मोहिमेस प्रारंभ झाला. पहिल्या टप्प्यात केवळ आरोग्य कर्मचारी आणि फ्रन्टलाइन वर्कर यांना लस देण्यात येत होती. १ मार्चपासून मात्र दुसऱ्या टप्प्यात ज्येष्ठ नागरिकांना व ४५ वर्षांवरील व्याधिग्रस्त नागरिकांना लस देण्यास सुरुवात झाली. त्यानंतर शासनाने १ एप्रिलपासून लसीकरणाची व्याप्ती आणखी वाढवत ४५ वर्षांवरील सर्वांनाच लस खुली केली.
आतापर्यंत नगर जिल्ह्याला ३ लाख ५७ हजार ७३० डोस शासनाकडून प्राप्त झाले आहेत. त्यात ३ लाख ३ हजार ५९० डोस कोविशिल्ड लसीचे, तर ५४ हजार १४० डोस कोव्हॅक्सिन लसीचे आहेत. त्यातून आतापर्यंत ३ लाख ३ हजार ७६५ डोस नागरिकांना देण्यात आले आहेत.
-----------------
आतापर्यंत झालेले लसीकरण
विभाग झालेले लसीकरण
आरोग्य कर्मचारी ४१२४१
महसूल १९४१
पोलीस ४८१३
पंचायत राज ४६८१
गृह व शहरी कामकाज २३५५
रेल्वे सुरक्षा बल ४२०
ज्येष्ठ नागरिक (४५ वर्षे पुढील) २४८३२४
---------------------------------
एकूण. ३०३७६५