शिवाजीनगरला लसीकरण केंद्र सुरू करावे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 26, 2021 04:22 IST2021-05-26T04:22:12+5:302021-05-26T04:22:12+5:30
शिवाजीनगर, वैष्णवी नगर, मराठा नगर, एकनाथ नगर, रभाजी नगर या भागातील नागरिकांना केडगाव व शहरातील लसीकरण केंद्रावर जावे लागत ...

शिवाजीनगरला लसीकरण केंद्र सुरू करावे
शिवाजीनगर, वैष्णवी नगर, मराठा नगर, एकनाथ नगर, रभाजी नगर या भागातील नागरिकांना केडगाव व शहरातील लसीकरण केंद्रावर जावे लागत आहे. अनेक ज्येष्ठ नागरिक व महिलांना लांब जाण्यासाठी मोठी गैरसोय होत आहे. सध्याची परिस्थिती भयानक व बिकट आहे. आरोग्य केंद्रावर मोठी गर्दी असल्याने गर्दीत ज्येष्ठ नागरिक व महिलांची गैरसोय होत आहे. तसेच कोरोना लसीकरण केंद्रावर असलेल्या गर्दीमुळे कोरोनाचा प्रादुर्भाव झपाट्याने वाढण्याची शक्यता आहे. लसीकरण केंद्रावर सुविधांचा अभाव असल्याने ज्येष्ठ नागरिकांचे अतोनात हाल होत आहे. शिवाजीनगर येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत कोरोना लसीकरण केंद्र सुरु केल्यास येथील नागरिकांची सोय होऊन इतर केंद्रावर होणारी गर्दी देखील कमी होणार असल्याचे निवेदनात म्हटले आहे.