आंबी येथे लसीकरण शिबिर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 25, 2021 04:23 IST2021-05-25T04:23:57+5:302021-05-25T04:23:57+5:30

काही दिवसांपूर्वी धनगर समाज संघर्ष समितीचे राहुरी तालुकाध्यक्ष जालिंदर रोडे यांनी राहुरीचे तहसीलदार फसियोद्दीन शेख यांच्याकडे याबाबत मागणी केली ...

Vaccination camp at Ambi | आंबी येथे लसीकरण शिबिर

आंबी येथे लसीकरण शिबिर

काही दिवसांपूर्वी धनगर समाज संघर्ष समितीचे राहुरी तालुकाध्यक्ष जालिंदर रोडे यांनी राहुरीचे तहसीलदार फसियोद्दीन शेख यांच्याकडे याबाबत मागणी केली होती.

आंबी येथील नागरिकांना देवळाली प्रवरा येथे लस घेण्यासाठी जावे लागत होते. आंबी येथील हनुमान मंदिराच्या सभागृहात लसीकरण पार पडले. पहिल्या टप्प्यात आंबीसाठी साठ डोस पुरविण्यात आले. हे डोस गावातील फ्रंटलाइन वर्कर्स आणि पंचेचाळीस वर्षांवरील नागरिकांना देण्यात आले.

या वेळी सरपंच बाळासाहेब साळुंके, उपसरपंच विजय डुकरे, पोलीस पाटील बाळासाहेब लोंढे, धनगर समाज संघर्ष समितीचे तालुकाध्यक्ष जालिंदर रोडे, तलाठी रूपेश कारभारी, ग्रामसेवक अभिजित पिंपळे, डॉ. वाळुंज, परिचारिका सिस्टर अमृत व आशासेविका उपस्थित होत्या.

Web Title: Vaccination camp at Ambi