रिक्त जागांमुळे शिक्षक संख्येचे गणित बिघडले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 29, 2021 04:22 IST2021-07-29T04:22:24+5:302021-07-29T04:22:24+5:30
अहमदनगर : जिल्ह्यात जिल्हा परिषदेच्या १६१ केंद्रप्रमुख, १८१ मुख्याध्यापक व ४२४ शिक्षकांची पदे रिक्त असल्याने शिक्षक संख्येचे गणित ...

रिक्त जागांमुळे शिक्षक संख्येचे गणित बिघडले
अहमदनगर : जिल्ह्यात जिल्हा परिषदेच्या १६१ केंद्रप्रमुख, १८१ मुख्याध्यापक व ४२४ शिक्षकांची पदे रिक्त असल्याने शिक्षक संख्येचे गणित बिघडले आहे. त्यामुळे अतिरिक्त कामाचा ताण शिक्षकांवर येत असून त्याचा परिणाम गुणवत्तेवर होत आहे.
विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक प्रगतीसाठी शिक्षण विभाग मागील काही वर्षांपासून प्रयत्न करीत आहे. त्याचा चांगला परिणामही जिल्ह्यात दिसून आला आहे. मात्र, कोरोना संकटामुळे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान झाले आहे. दरम्यान, जिल्ह्यात अनेक वर्षांपासून संचमान्यता झाली नसल्याने तसेच अनेक जागा रिक्त असल्याने शिक्षक संख्येचे गणित बिघडले आहे. १८१ मुख्याध्यापकांची पदे रिक्त असल्याचे मुख्याध्यापकांचा पदभार शिक्षकांना पहावा लागतो. त्यामुळे अध्यापनाकडे दुर्लक्ष होते.
याशिवाय एकेका केंद्रप्रमुखाकडे तीन-चार केंद्रांचा भार असल्याने ते तणावात आहेत. सद्य:स्थितीत १६१ केंद्रप्रमुखांची पदे रिक्त आहेत. दुसरीकडे ३५ विस्तार अधिकारी पदे रिक्त असल्याने तीही जबाबदारी केंद्रप्रमुखांकडे देण्यात आलेली आहे. एकूणच शिक्षक भरती व पदोन्नत्या रखडल्याने शिक्षक संख्येचे गणित बिघडले आहे. त्याचा थेट परिणाम विद्यार्थ्यांच्या गुणवत्तेवर होत आहे.
-------------------
तालुकानिहाय रिक्त पदे
तालुका केंद्रप्रमुख मुख्याध्यापक पदवीधर उपाध्यापक
अकोले १३ १३ ११ १५
संगमनेर १८ १४ ९ २१
कोपरगाव ७ ११ १८ २४
राहाता ८ ११ ५ १०
श्रीरामपूर ६ ११ २ ९
राहुरी १० १० ५ १३
नेवासा १३ २४ ११ २४
शेवगाव ११ १२ ५ १५
पाथर्डी १३ २ ९ १८
जामखेड १० १३ १४ २४
कर्जत ११ ११ १२ २७
श्रीगोंदा १४ १४ १३ २३
पारनेर १६ ७ ९ ५
नगर ११ १८ १० १४
----------------------------------------------------------
एकूण १६१ १७७ १३३ २४८
उर्द माध्यम - ४ २५ २८
----------------------------
समायोजन व्हावे...
शैक्षणिक सत्राच्या सुरुवातीला समायोजन होणे आवश्यक आहे. मात्र, अर्धे सत्र निघून जाते. तरीही जागा रिक्तच राहतात. त्यामुळे शैक्षणिक प्रक्रियेला बाधा निर्माण होते. सेवानिवृत्त, मृत्यू व अन्य कारणांनी जागा रिक्त झालेल्या आहेत. त्या समायोजन व मुख्याध्यापक पदोन्नती प्रक्रियेने लवकर भरण्यात याव्यात, अशी मागणी शिक्षक संघटनांमधून पुढे येत आहे.
-----------------------------------------------------------------------
सूचना---तालुकानिहाय रिक्त पदे तालुका केंद्रप्रमुख मुख्याध्यापक पदवीधर उपाध्यापक ( बरोबर आहे का? खात्री करून घ्यावी)