पाण्यासाठी रस्सीखेच सुरूच

By Admin | Updated: June 27, 2023 10:38 IST2014-05-12T00:37:46+5:302023-06-27T10:38:25+5:30

अहमदनगर: मुळा धरणातून शेतीसाठी अपेक्षेपेक्षा उशिराने अवर्तन सुटल्यामुळे पाणी वाटपाचे नियोजन कोलमडले आहे़

Use the rope to water | पाण्यासाठी रस्सीखेच सुरूच

पाण्यासाठी रस्सीखेच सुरूच

अहमदनगर: मुळा धरणातून शेतीसाठी अपेक्षेपेक्षा उशिराने अवर्तन सुटल्यामुळे पाणी वाटपाचे नियोजन कोलमडले आहे़ उन्हाचा पारा चढल्याने पिके करपली असून, पाण्यावर शेतकर्‍यांच्या अक्षरशा उड्या पडल्या असून, पाण्यासाठी मोठी रस्सीखेच लाभ क्षेत्रात सुरू आहे़ त्यामुळे प्रशासनाला तारेवरची कसरत करावी लागत आहे़ मुळा धरणातून एप्रिलच्या पहिल्या आठवड्यात आवर्तन सोडण्याचे ठरले होते़ परंतु आवर्तनाला परवानगी मिळाली नाही़ त्यात लोकसभा निवडणुकही जाहीर झाली़ त्यामुळे पाणी सोडण्यास विलंब झाला़ एप्रिलच्या शेवटच्या आठवड्यात सुटले़ तोपर्यंत उन्हाळी पिकांनी माना टाकल्या होत्या. पाणी घेण्यासाठी सर्वच शेतकरी सरसावले असले तरी शेवटच्या टोकाचा पहिला माऩ त्यामुळे सर्वांची अडचण झाली़ शेवटच्या टोकापासून पाण्याचे वाटप करावे, असे संकेत आहेत़ मात्र पहिले कोण असा प्रश्न उपस्थित करत शेतकर्‍यांनी मध्येच पाणी घेण्यास सुरुवात केली़ शेतकर्‍यांची भूमिका रास्त आहे़ परंतु एकाच वेळी सर्वांना पाणी कसे देणार असा प्रश्न प्रशासनासमोर होता़ त्यामुळे अखेर प्रशासनाने सर्वच दरवाजे उघडे करून दिले असून, एक ना धड भाराभर चिंध्या अशी अवस्था झाली आहे़ प्रशासनाचे नियोजनही योग्यच होते़ त्यानुसार उशिर होणार असल्याने शेतकर्‍यांनी अक्रमक भूमिका घेतली़ सुरुवातीला टेलच्या परिसरात पाणी सोडण्याचा प्रयोग झाला़ पण किती दिवस थांबायचे पिके गेल्यानंतर पाणी मिळाले तर त्याचा उपयोग काय असा प्रश्न शेतकर्‍यांचा आहे़ काहींनी तर चोरी करून पाणी घेतले़ पाणी चोरीचे गुन्हे दाखल झाले आहेत़ पाणी वाटपात असमतोल होत असल्याने अखेर सर्वांनाच पाणी सोडण्यात आले आहे़ यातही पाणी घेण्यासाठी शेतकर्‍यांत चढाओळ सुरू असून, पाणी वापर संस्था व प्रशासनाला पाणी वाटप करताना तारेवरची कसरत करावी लागत आहे़ कमी वेगाने पाणी सोडल्याने शेतकर्‍यांमध्ये नाराजीचा सूर आहे़ मात्र सर्वांना पाणी मिळेल, याची खात्री प्रशासनाकडून दिली जात असून, अवर्तनात आणखी काही दिवसांची वाढ करावी लागणार असल्याचे सुत्रांकडून सांगण्यात आले़ (प्रतिनिधी) लाभ क्षेत्रातील ६० टक्के भरणे पूर्ण मुळा धरणातून आत्तापर्यंत २ हजार ६०० दशलक्ष घनफुट पाणी शेतीसाठी सोडण्यात आले आहे़ लाभ क्षेत्रातील नेवासा, पाथर्डी आणि शेवगाव परिसरातील ६० टक्के क्षेत्र ओलीताखाली आहे़ उर्वरित क्षेत्रासाठी पाणी मिळणार असून, आवर्तन आणखी १५ दिवस चालणार आहे़ पाणी आणखी पंधरा दिवस राहणार आवर्तन सोडण्यास विलंब झाला़ त्यामुळे पिके करपली आहेत़ आहे त्या पाण्यात भरणे काढणे शक्य नाही़ पाणी वाटप यंत्रणेवर ताण आला असून, आवर्तन आणखी पंधरा दिवस सुरू राहणार आहे़ अधिकार्‍यांचा खडा पहारा उन्हाळी आवर्तन असल्याने चोरून पाणी घेणार्‍यांची संख्या अधिक आहे़ मोटारी व पाईप टाकून पाणी घेतले जात असल्याने खाली पाणी पोहोचत नाही़ पाण्याची चोरी रोखण्यासाठी अधिकारी व पाणी वापर संस्थांच्या पदाधिकार्‍यांचा खडा पाहारा सुरू आहे़ पाणी वाटपाबाबत कार्यकारी अभियंत्यांशी संपर्क साधला असता पाणी वाटपात शेतकर्‍यांच्या सहकार्याची गरज आहे़ पाणी सोडण्यास आधीच उशिर झाला़ त्यात पाट फुटला, त्यामुळे आणखी उशिर झाला़ पण शेतकर्‍यांनी सहकार्य केल्यास योग्य नियोजन करणे शक्य होईल आणि सर्वांना पुरेसे पाणी मिळेल़ - आनंद वडार, कार्यकारी अभियंता, पाटबंधारे

Web Title: Use the rope to water

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.