कोपरगावात युरिया विक्रीला सुरुवात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 25, 2021 04:18 IST2021-07-25T04:18:37+5:302021-07-25T04:18:37+5:30
प्रारंभी शेतकरी सहकारी संघाचे अध्यक्ष संभाजी गावंड, उपाध्यक्ष विलास कुलकर्णी यांनी उपस्थितांचे स्वागत केले. याप्रसंगी संचालक बबन निकम, ...

कोपरगावात युरिया विक्रीला सुरुवात
प्रारंभी शेतकरी सहकारी संघाचे अध्यक्ष संभाजी गावंड, उपाध्यक्ष विलास कुलकर्णी यांनी उपस्थितांचे स्वागत केले. याप्रसंगी संचालक बबन निकम, वाल्मीक भास्कर, विजय रोहम, चंद्रकांत देवकर, कोल्हे कारखान्याचे उपाध्यक्ष आप्पासाहेब दवंगे, साखर सरव्यवस्थापक शिवाजी दिवटे, रघुनाथ फटांगरे आदी उपस्थित होते.
कोल्हे म्हणाले, देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आत्मनिर्भर भारत व आत्मनिर्भर कृषीच्या धर्तीवर देशी मालकीचे तंत्रज्ञान विकसित व्हावे यासाठी विशेष धोरणात्मक निर्णय घेतले. त्यानुसार इफको या संस्थेने बायोटेक्नॉलॉजी संशोधन केंद्रात संशोधित करून नॅनो युरिया लिक्विड उत्पादन घेतले. त्याच्या विविध ठिकाणी असंख्य पिकांवर, राष्ट्रीय कृषी संशोधन यंत्रणा अंतर्गत वीस संशोधनपर संस्था, राज्य कृषी विद्यापीठे, केव्हीके केंद्रे येथे ४३ पिकांवर तर देशातील ११ हजार शेतकऱ्यांच्या शेतातील ९४ पेक्षा अधिक पिकांवर चाचण्या घेण्यात आल्या, त्यातून पीक उत्पादनात आठ टक्के वाढ दिसून आली. या नॅनो युरियामुळे पिकाला बळकटी, आरोग्यदायक व आर्द्रता परिणाम संरक्षित करते. नॅनो युरिया लिक्विड ५०० मिली बॉटल स्वरूपात २४० रुपयास विक्रीस उपलब्ध आहे. व्यवस्थापक हरिभाऊ गोरे यांनी आभार मानले.
...............फोटो२४ - युरिया विक्री - कोपरगाव