एशियन ग्रांडप्रिक्ससाठी नगरच्या कोलतेची निवड
By Admin | Updated: July 1, 2014 00:16 IST2014-06-30T23:30:20+5:302014-07-01T00:16:12+5:30
अहमदनगर : तैवान येथे होणाऱ्या एशियन ग्रांडप्रिक्स स्पर्धेसाठी भारतीय संघात नगरच्या भाग्यश्री कोलतेची निवड झाली आहे.
एशियन ग्रांडप्रिक्ससाठी नगरच्या कोलतेची निवड
अहमदनगर : तैवान येथे होणाऱ्या एशियन ग्रांडप्रिक्स स्पर्धेसाठी भारतीय संघात नगरच्या भाग्यश्री कोलतेची निवड झाली आहे. आर्चरी असोसिएशन आॅफ इंडिया आयोजित चौथ्या मानांकन धनुर्विद्या स्पर्धेत तिने उत्कृष्ट कामगिरी केली.
हैदराबाद येथे चौथी भारतीय मानांकन धनुर्विद्या कनिष्ठ गटाची स्पर्धा झाली. त्यात भाग्यश्रीने उत्कृष्ट खेळ केला. तैवान येथे १० ते १५ आॅगस्ट दरम्यान ही स्पर्धा होणार आहे.
भाग्यश्री नेवासा फाटा येथील दादासाहेब घाडगे पाटील माध्यमिक विद्यालयाची विद्यार्थिनी आहे. तिने शालेय व संघटनेच्या स्तरावर राष्ट्रीय स्पर्धेत २२ सुवर्ण, ६ रौप्य व ५ कांस्य पदके पटकावली आहेत. ती सातवीत असल्यापासून घाटगेपाटील विद्यालयात मुख्य प्रशिक्षक अभिजीत दळवी व शुभांगी रोकडे यांच्या मार्गदर्शनाखाली सराव करते. दहावीचे वर्ष असतानाही तिने स्पर्धांमध्ये चांगली कामगिरी केली.
भाग्यश्री मूळ पुणे जिल्ह्यातील लोणीकंद येथील सामान्य शेतकरी कुटुंबातील आहे.
या कामगिरीमुळे धनुर्विद्या संघटनेचे अध्यक्ष प्रशांत देशपांडे, सचिव प्रमोद चांदूरकर, त्रिमूर्तीचे संस्थापक साहेबराव घाडगे, अध्यक्ष सुमतीताई घाडगे यांनी तिचा सत्कार केला.(क्रीडा प्रतिनिधी)