शहीद जवान कपिल गुंड यांच्या पुतळ्याचे अनावरण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 06:41 IST2021-02-05T06:41:22+5:302021-02-05T06:41:22+5:30
श्रीगोंदा : तालुक्यातील अजनूज येथील शहीद जवान कपिल नामदेव गुंड यांच्या बलिदानाचा इतिहास तेवत ठेवण्यासाठी गावात त्यांचा पुतळा असलेले ...

शहीद जवान कपिल गुंड यांच्या पुतळ्याचे अनावरण
श्रीगोंदा : तालुक्यातील अजनूज येथील शहीद जवान कपिल नामदेव गुंड यांच्या बलिदानाचा इतिहास तेवत ठेवण्यासाठी गावात त्यांचा पुतळा असलेले प्रवेशद्वार साकारले आहे. प्रजासत्ताकदिनी पुतळा व प्रवेशद्वाराचे अनावरण वीरपत्नी माधुरी, वीरमाता पुष्पाबाई गुंड व अजनूजकरांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी अनेकांच्या डोळ्याच्या कडा पाणावल्या.
नामदेव व पुष्पा गुंड यांचा मुलगा कपिलला काश्मीर राज्यातील राजौरी सेक्टरमध्ये भारत मातेची सेवा बजावत असताना १५ नोव्हेंबर २०१८ रोजी वीरमरण आले होते. गुंड परिवार व अजनूजकरांनी मुख्य चौकातून गावात जाणाऱ्या रस्त्यावर कपिलचा पुतळा असलेले प्रवेशद्वार केले आहे. कोरोनाच्या संकटामुळे ग्रामस्थांनी साध्या पद्धतीने या कार्यक्रमाचे आयोजन केले होते.
यावेळी माजी जिल्हा परिषद सदस्य बाळासाहेब गिरमकर, सुरेश क्षीरसागर, श्रीपाद ख्रिस्ती, दत्तात्रय गायकवाड, विशाल कवडे, राजेंद्र गिरमकर, अंकुश घाडगे, सुभेदार बबनराव आरेकर, सुभाष सूर्यवंशी, मेजर संदीप सांगळे, संदीप मते, महेंद्र जगदाळे, लहुजी घाडगे, पांडुरंग घाडगे, मिनीनाथ जगदाळे आदी उपस्थित होते.
फोटो ३० अजूनज, १
अजनूज येथे शहीद जवान कपील गुंड यांच्या पुतळ्याचे अनावरण करण्यात आले.