श्रीगोंदा : इफको आणि श्रीगोंदा तालुका कृषी विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने कंपनीच्या नॅनो युरियाचे अनावरण बुधवारी करण्यात आले.
यावेळी इफको कंपनीचे प्रतिनिधी दिनेश देसाई, पंचायत समितीचे कृषी अधिकारी डॉ. राम जगताप, किसान मंडळ कृषी अधिकारी सांगळे, अभिजित काळाणे संतोष कापसे, सुनील ढवळे, किशोर भोस, मधुकर काळाणे, परशू लांडगे आदी उपस्थित होते.
यावेळी देसाई यांनी नॅनो युरियाचे महत्त्व सांगितले. तालुक्यातील खताच्या बफर स्टॉकविषयी छेडले असता, असोसिएशनचे अध्यक्ष सुनील ढवळे यांनी तालुक्यातील युरियाच्या बफर साठ्यावरून चालू असलेल्या काही बाबी उघड केल्या. यामध्ये सध्या तालुक्यात असलेला बफर साठा हा महाराष्ट्र कृषी उद्योग विकास महामंडळ, अहमदनगर यांच्या अधिकृत वितरक म्हणून आपणाकडे साठवण्यात आला होता. त्यातील ३० टक्के म्हणजे ७७ टन साठा स्वतःच्या दुकानातून तालुक्यातील शेतकरी आणि शेतकरी गट यांना विक्रीस परवानगी असल्याचे सांगितले. परंतु, काही व्यावसायिक प्रतिस्पर्धी फक्त व्यावसायिक आकसापोटी यांना ४० टन आणि इतरांना ४ टन कसा म्हणून विरोध करत असल्याचे त्यांनी सांगितले.