माळीवाडा व नालेगाव तलाठी कार्यालयात माहिती फलकाचे अनावरण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 20, 2021 04:16 IST2021-07-20T04:16:42+5:302021-07-20T04:16:42+5:30
तलाठी कार्यालयातील माहिती फलकाचे अनावरण मंडळ अधिकारी राजेंद्र आंधळे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी छत्रपती सामाजिक संघटनेचे संस्थापक अध्यक्ष ...

माळीवाडा व नालेगाव तलाठी कार्यालयात माहिती फलकाचे अनावरण
तलाठी कार्यालयातील माहिती फलकाचे अनावरण मंडळ अधिकारी राजेंद्र आंधळे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी छत्रपती सामाजिक संघटनेचे संस्थापक अध्यक्ष हरिभाऊ वाघचौरे, नालेगाव तलाठी सागर भापकर, माळीवाडा तलाठी सुनील खंडागळे, जनार्धन साळवे, सागर भिंगारदिवे, संघटनेचे शहराध्यक्ष सूरज रोहोकले, शिवकुमार शेळके, जिल्हा उपाध्यक्ष अॅड. अशोक कोल्हे, सचिन एकाडे, दीपक पाचारणे, सिमोन बोर्डे, राजेंद्र जगताप, राजेंद्र दळवी, विकास भांबरकर, प्रशांत चौधरी आदी उपस्थित होते.
माळीवाडा व नालेगाव तलाठी कार्यालयात विविध कामासाठी नागरिक येत असतात. कोणत्या कामासाठी किती शुल्क, कोणते काम नि:शुल्क तर किती कालावधी लागणार, याची माहिती नसल्याने त्यांची गैरसोय होत होती. कर्मचारी व नागरिकांमध्ये अनेक वेळा वाद व्हायचे. त्यामुळे कार्यालयाबाहेर फलक लावण्याची मागणी श्री छत्रपती सामाजिक संघटनेच्या वतीने करण्यात आली होती. अखेेर असा फलक लावण्यात आला.