मांडवा विविध कार्यकारी सोसायटीची निवडणूक बिनविरोध

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 27, 2021 04:27 IST2021-02-27T04:27:15+5:302021-02-27T04:27:15+5:30

अहमदनगर : नगर तालुक्यातील मांडवा विविध कार्यकारी सोसायटीची निवडणूक बिनविरोध झाली. गावातील राजकीय हेवेदावे बाजूला ठेवून सोसायटी बिनविरोध केल्याने ...

Unopposed election of various executive societies | मांडवा विविध कार्यकारी सोसायटीची निवडणूक बिनविरोध

मांडवा विविध कार्यकारी सोसायटीची निवडणूक बिनविरोध

अहमदनगर : नगर तालुक्यातील मांडवा विविध कार्यकारी सोसायटीची निवडणूक बिनविरोध झाली. गावातील राजकीय हेवेदावे बाजूला ठेवून सोसायटी बिनविरोध केल्याने संचालकांचा माजी आमदार शिवाजी कर्डिले यांनी सत्कार केला.

कर्डिले म्हणाले, मांडवा विविध कार्यकारी सेवा सोसायटीची निवडणूक सर्वांच्या सहकार्यातून बिनविरोध करून इतर सोसायट्यांसमोर एक आदर्श ठेवला आहे, असे कर्डिले यांनी सांगितले. यावेळी सोसायटीचे संचालक बाळासाहेब निमसे, पंढरीनाथ निमसे, ज्ञानेश्वर निमसे, पांडुरंग निमसे, शिवाजी निमसे, बाळासाहेब निमसे, ज्ञानदेव निमसे, गंगाधर निक्रड, महादेव निक्रड, सुरेखा दत्तात्रय निक्रड, छाया विलास निमसे, जनार्दन गांगुर्डे, सरपंच सुभाष निमसे, ग्रामपंचायत सदस्य मीरा निक्रड, दिलीप निक्रड, बहिरू निमसे, अशोक निमसे, जया निमसे, भाऊ निमसे, निर्मला पंडित आदींची उपस्थिती होती.

....

Web Title: Unopposed election of various executive societies