एकलहरे सरपंचासह दोघांचे सदस्यत्व रद्द

By Admin | Updated: October 13, 2016 00:45 IST2016-10-13T00:14:37+5:302016-10-13T00:45:32+5:30

श्रीरामपूर : तालुक्यातील एकलहरे ग्रामपंचायतीच्या सरपंच सुनीता दादासाहेब बनसोडे व सदस्या कोकीला संजय अग्रवाल यांनी जातवैधता प्रमाणपत्र सादर न केल्याने निवडणूक आयोगाने त्यांचे सदस्यत्व रद्द केले आहे.

Unlawful membership with Eklavya Sarpanch | एकलहरे सरपंचासह दोघांचे सदस्यत्व रद्द

एकलहरे सरपंचासह दोघांचे सदस्यत्व रद्द


श्रीरामपूर : तालुक्यातील एकलहरे ग्रामपंचायतीच्या सरपंच सुनीता दादासाहेब बनसोडे व सदस्या कोकीला संजय अग्रवाल यांनी जातवैधता प्रमाणपत्र सादर न केल्याने निवडणूक आयोगाने त्यांचे सदस्यत्व रद्द केले आहे.
बनसोडे या प्रभाग ३ मधून, तर अग्रवाल प्रभाग नं.१ मधून निवडून आल्या होत्या. एकलहरे ग्रामपंचायत सदस्यांनी तातडीने बैठक होऊन उपसरपंच नसीम खान लालमहंमद जहागीरदार यांच्याकडे सरपंचपदाचा पदभार तात्पुरता सोपविण्यात आला आहे. जातप्रमाणपत्र उपलब्ध न झाल्यामुळे अप्पर जिल्हाधिकारी बी.एच.पालवे यांनी १६ सप्टेंबर २०१६ पासून त्यांची निवड रद्द केल्याचे आदेश दिले. ग्रामपंचायतीचे राजकारणात नसीमखान जहागीरदार व रविंद्र भालेराव या दोन सदस्यांना काँग्रेस पक्ष सोडून राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला होता. भानुदास मुरकुटे, जिल्हा परिषदेचे सभापती शरद नवले व विलास ठोंबरे यांच्या नेतृत्वाखाली निवडणूक लढवून विजयी झाल्या होत्या. ग्रामपंचायतीमध्ये एकूण ९ सदस्य आहे. यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे ५ तर काँग्रेसचे ४ सदस्य आहेत. (वार्ताहर)

Web Title: Unlawful membership with Eklavya Sarpanch

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.