विद्यापीठ उपकेंद्रास मंत्रिमंडळाची मंजुरी
By Admin | Updated: August 14, 2014 01:48 IST2014-08-14T01:22:48+5:302014-08-14T01:48:46+5:30
अहमदनगर : पुणे विद्यापीठाच्या नगर येथील उपकेंद्रास बुधवारी झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत अंतिम मंजुरी मिळाली

विद्यापीठ उपकेंद्रास मंत्रिमंडळाची मंजुरी
अहमदनगर : पुणे विद्यापीठाच्या नगर येथील उपकेंद्रास बुधवारी झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत अंतिम मंजुरी मिळाली असल्याची माहिती विद्यापीठाचे अधिसभा सदस्य प्रशांत गडाख यांनी दिली.
गडाख यांच्या पुढाकाराने मार्च २०१४ मध्ये जिल्ह्यातील सिनेट सदस्यांनी अहमदनगर येथे उपमुख्यमंत्री अजित पवार यांची भेट घेतली होती. उपकेंद्राच्या मान्यतेसाठी उच्च शिक्षण विभागाकडे प्रस्तावातील त्रुटी दूर करून फेरप्रस्ताव दाखल केला होता. असे असताना शासनाकडून उपकेंद्रास मान्यता व निधी लवकर मिळावा अशी आग्रही मागणी जिल्ह्यातील सर्व सिनेट सदस्यांची केली.
प्रशांत गडाख, राजेंद्र विखे यांच्यासह युवराज नरवडे, शिवाजी साबळे, डॉ. पंधरकर आदींनी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, उपमुख्यमंत्री पवार, उच्च व तंत्रशिक्षण मंत्री राजेश टोपे व महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांच्यातर्फे पाठपुरावा केला होता. मागील आठवड्यातच मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांची मान्यता मिळवून ही फाईल कॅबिनेटपुढे आली. बुधवारी अखेर याला अंतिम मंजुरी मिळाली.
या उपकेंद्रामुळे नगर शहरासह जिल्हातील १२२ महाविद्यालयामधील कर्मचाऱ्यांसह सुमारे २ लाख विद्यार्थ्यांची वेळेची व आर्थिक बचत होणार आहे. विद्यापिठास्तरावर उपकेंद्राच्या वॉल कंपाऊंडसह मास्टर प्लॅन उभारणीसंबंधी पाठपुरावा करण्यात येईल व हे उपकेंद्र लवकर कसे उभे राहील यासाठी सर्व सिनेट सदस्यांच्या सहकार्यांने प्रयत्न करणार असल्याचे गडाख यांनी सांगितले.
(प्रतिनिधी)