शिर्डी - केंद्रीय गृह आणि सहकार मंत्री अमित शाह यांनी आज, दि. ५ रोजी शिर्डी येथील श्री साईबाबा समाधी मंदिरात जाऊन श्री साईबाबांचे दर्शन घेतले. त्यांच्यासमवेत राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार हे देखील उपस्थित होते.
श्री. शाह यांनी प्रथम श्री साईबाबा समाधीचे दर्शन व पाद्यपूजा केली, त्यानंतर त्यांनी गुरूस्थान येथेही नतमस्तक होऊन दर्शन घेतले. या भेटीदरम्यान, महाराष्ट्राचे जलसंपदा मंत्री तथा पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील, महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे, जलसंपदा मंत्री गिरीश महाजन, पर्यावरण व वातावरणीय बदल मंत्री पंकजा मुंडे, ग्रामविकास व पंचायतराज मंत्री जयकुमार गोरेआदी होते.
साईबाबांच्या दर्शनानंतर श्री साईबाबा संस्थानच्यावतीने केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांचा यथोचित सत्कार करण्यात आला. याप्रसंगी जिल्हाधिकारी डॉ. पंकज आशिया, जिल्हा पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आनंद भंडारी, तसेच साईबाबा संस्थानचे मुख्य कार्यकारी अधिकारी गोरक्ष गाडीलकर हे उपस्थित होते.देशातील महत्त्वाचे नेते शिर्डीत एकत्र आल्याने या भेटीला विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे.
Web Summary : Union Home Minister Amit Shah visited Shirdi Sai Baba Temple with CM Fadnavis, Dy CMs Shinde and Pawar. He performed prayers and was honored by the temple trust. Key ministers and officials were also present, adding significance to the visit.
Web Summary : केंद्रीय गृह मंत्री अमित शाह ने मुख्यमंत्री फडणवीस, उपमुख्यमंत्री शिंदे और पवार के साथ शिरडी साईं बाबा मंदिर का दौरा किया। उन्होंने प्रार्थना की और मंदिर ट्रस्ट द्वारा सम्मानित किया गया। प्रमुख मंत्री और अधिकारी भी उपस्थित थे, जिससे यात्रा का महत्व बढ़ गया।