राहुरी तालुक्यात आढळला अनोळखी महीलेचा मृतदेह
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 29, 2018 17:36 IST2018-06-29T17:36:17+5:302018-06-29T17:36:33+5:30
हुरी ते मांजरी रस्त्यालगत वळण परिसरात एका अनोळखी महीलेचा मृतदेह आढळून आला़ पे्रताला मुंग्या लागलेल्या अवस्थेत आढळलेली महीला कलावंतीण असावी असा पोलिसांना संशय आहे़ गळ््याला आवळल्याची खून आहे.

राहुरी तालुक्यात आढळला अनोळखी महीलेचा मृतदेह
वळण : राहुरी ते मांजरी रस्त्यालगत वळण परिसरात एका अनोळखी महीलेचा मृतदेह आढळून आला़ पे्रताला मुंग्या लागलेल्या अवस्थेत आढळलेली महीला कलावंतीण असावी असा पोलिसांना संशय आहे़. गळ््याला आवळल्याची खून आहे.
पोलिस पाटील सोमनाथ डमाळे यांनी राहुरीचे पोलिस निरीक्षक अविनाश शिळीमकर यांना मोबाईलवरून माहीती दिली. रस्त्याच्या बाजूच्या खड्ड्यात आढळलेल्या महीलेच्या अंगावर मुंग्या आढळून आल्या. वय-३० वर्षाच्या दरम्यान असून डाव्या हाताच्या अंगठ्याजवळ इंग्रजीअक्षरात ‘जी’ व कांबीवर ‘जे. ए.’ असे गोंधलेले आहे. दोन्ही हाता- पायांना मेंहदी लावलेली असून पायात पट्ट्या व उजव्या पायाच्या बोटात जोडवे, मासुळी आहे. भगव्या पांढ-या रगांची साडी, कानात फुल व डाव्या हातात अंगठ्या आहेत. गळा आवळून पे्रत वळण परिसरात आणून टाकले असावे, असा पोलिसांना संशय आहे. यासंदर्भात राहुरी पोलिस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.