शहरं
Join us  
Trending Stories
1
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
2
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
3
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
4
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
5
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
6
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
7
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
8
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
9
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
10
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
11
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
12
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
13
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
14
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
15
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
16
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
17
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
18
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
19
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
20
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
Daily Top 2Weekly Top 5

पाण्यासाठी सरकारला भीक मागावी लागते, हे दुर्दैव : मानसी नाईक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 11, 2019 13:22 IST

पाण्यासाठी सरकारला भीक मागावी लागते. यासारखे दुसरे दुर्दैव काय कमर्शियल फायदा घ्यायचा किंवा फेमस होण्यासाठी येथे आलेले नाही.

योगेश गुंडअहमदनगर : एखाद्या कलाकाराने सामाजिक प्रश्नांसाठी केलेले उपोषण किंवा आंदोलन हे काही सिनेमाचे शुटिंग नसते. त्याच्यातील माणुसकी दाखवण्यासाठी तो सामाजिक लढ्यात सहभागी होऊन सरकारशी भांडत असतो. मात्र त्याचा चुकीचा अर्थ काढून त्याकडे दुर्लक्ष करण्यात येत असते हे संतापजनक आहे. टीक टॉकवर ग्रामीण ढंग फारच फेमस होत आहेत. मात्र ग्रामीण भागातील पाणी टंचाईसारख्या समस्या का फेमस होत नाहीत? असा सवाल अभिनेत्री मानसी नाईक यांनी उपस्थित केला.अभिनेत्री दीपाली सय्यद यांनी साकळाई जलसिंचन योजनेच्या मंजुरीसाठी उपोषण सुरू केले आहे. त्यास पाठिंबा देण्यासाठी मानसी नाईक नगरला आल्या होत्या. त्यावेळी तिच्याशी झालेली बातचीत अशी.उपोषणाला पाठिंबा देण्यामागची भूमिका काय ?मी टाळ्या घेण्यासाठी येथे आले नाही. दीपाली माझी सावली आहे. पाण्यासाठी सरकारला भीक मागावी लागते. यासारखे दुसरे दुर्दैव काय कमर्शियल फायदा घ्यायचा किंवा फेमस होण्यासाठी येथे आलेले नाही.ग्रामीण भागातील प्रश्नाविषयी आपले मत काय?सध्या टीक टॉकवर ग्रामीण भाग जोरात आहे. अस्सल ग्रामीण भाषेतील व्हिडिओ लवकर फेमस होतात. मग टीक टॉकमधून ग्रामीण भागातील समस्या का दाखवल्या जात नाहीत?सरकारने आंदोलनाकडे दुर्लक्ष केले का?सरकारला वाटते दीपालीला निवडणुकीत उभे राहायचे आहे. म्हणून तिच्या उपोषणाकडे दुर्लक्ष होत आहे. पण हा काही सिनेमातील सीन नाही. कोणीही आमरण उपोषण करून दाखवावे माझे चॅलेंज आहे. हे सोपे काम नाही. सरकारचा एकही प्रतिनिधी उपोषण थांबवण्यासाठी पुढे येत नाही.चाहत्यांना काय संदेश द्याल?कलाकारांचे आंदोलन हे काय सिनेमातील शुटिंग नसते. नुसते येऊन पाहू नका. त्यास पाठिंबा द्या. काहीजण फक्त नटी आहे म्हणून पाहतात व निघून जातात. हे योग्य नाही यास सर्वांचा पाठिंबा मिळायला हवा. फक्त सेल्फी व पोस्ट टाकू नका.तुमचा पाणी टंचाईशी संबंध आला का?मी पुण्या, मुंबईत वाढले आहे. अस्सल पुणेकर आहे. लहानपणापासून लाडात वाढली असल्याने पाण्यावाचून ग्रामीण भाग कसा तळमळतो हे पहिल्यांदा पाहत आहे. मुंबई पुण्यात माणुसकी हरवत चालली आहे. खरी माणुसकी ग्रामीण भागात पाहायला मिळते.टीक टॉकवर ग्रामीण ढंग फारच फेमस होत आहेत. मात्र पाणी टंचाईसारख्या समस्या का फेमस होत नाहीत? - मानसी नाईक

 

टॅग्स :Ahmednagarअहमदनगरahmednagar collector officeअहमदनगर जिल्हाधिकारी कार्यालयDevendra Fadnavisदेवेंद्र फडणवीसSujay Vikheसुजय विखेRadhakrishna Vikhe Patilराधाकृष्ण विखे पाटीलMansi Naikमानसी नाईक